मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
राज्यात होत असलेली अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा अर्ज भरण्यास अडचण येत असल्याने त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य परीक्षा मंडळाने घेतला आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना दूरध्वनी करून मुदतवाढ देण्याबाबत निर्देश दिले होते.
राज्यातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना परीक्षा अर्ज भरण्याची 30 सप्टेंबर 2025 रोजी शेवटची मुदत आहे. मात्र मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर आणि राज्यात होत असलेली अतिवृष्टिमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना मुदतीत परीक्षेसाठी अर्ज भरणे शक्य नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी, पालकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना संपर्क करून अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली होती.
त्यानुसार उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शिक्षण मंत्री श्री. भुसे यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याबाबत निर्णय घेण्यास सांगितले. शिक्षण मंत्र्यांनी लगेचच राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले.
त्यानुसार शिक्षण विभागामार्फत 20 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत 10 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्यात पूरस्थिती
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सीना नदीचं पाणी अनेक घरांमध्ये गेल्यामुळे गावकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
यामध्ये अनेक कुटुंबात 12 वीत शिकणारे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांचे आताच शारीरिक नुकसान झालं आहे. असं असताना त्यांचं मानसिक नुकसान होऊ नये, म्हणून त्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. यामुळे विद्यार्थी थोडा वेळ घेऊन अर्ज भरु शकतात.
HSC बोर्ड परीक्षा 2025 कधी घेण्यात आली?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) HSC मुख्य परीक्षा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च 2025 दरम्यान घेतली. ही परीक्षा विज्ञान, वाणिज्य आणि कला या सर्व स्ट्रीम्ससाठी एकाच वेळी पार पडली.
HSC निकाल 2025 कधी जाहीर झाला?
HSC मुख्य परीक्षेचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर झाला. यंदाच्या परीक्षेत एकूण 91.88% विद्यार्थी उत्तीर्ण झाले, जो गेल्या वर्षीच्या 93.37% पेक्षा किंचित कमी आहे. निकाल mahahsscboard.in वर उपलब्ध आहे.
HSC परीक्षेत पास होण्यासाठी किती गुण आवश्यक आहेत?
प्रत्येक विषयासाठी किमान 35% गुण (थिअरी आणि प्रॅक्टिकल एकत्रित) मिळवणे आवश्यक आहे. एकूण गुण 100 पैकी 35 गुण असावेत. जर विद्यार्थी एका विषयात अपयशी ठरला तरी इतर विषयांमध्ये चांगले गुण मिळवले तरी एकूण पास होऊ शकतो.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज