टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा-मरवडे मार्गावर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करीत असताना दंडाच्या कारवाईवरून एका जीप चालकाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या
श्रीमुखात वाजवुन मशिनची तोडफोड शासकीय करून कामात अडथळा आणल्या प्रकरणी संतोष लक्ष्मण राठोड (रा. बालाजीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी पोलीस शिपाई सत्यवान शिंदे हे वाहतूक शाखेत कार्यरत आहेत.
त्यांच्यासमवेत पोलीस नाईक शिवाजी पांढरे ही असतात मात्र त्यांची साप्ताहिक सुट्टी असल्याने फिर्यादी एकटेच कर्तव्यावर होते.
सकाळी १० वाजता मंगळवेढा शहरात मोटर वाहन कायद्याप्रमाणे १८ केसेस करण्यात आल्या नंतर ते सायंकाळी ४.३० वाजता मरवडे रोडवरील रिलायन्स पंपाजवळ कारवाई करण्यासाठी थांबले असता
मरवडेकडून मंगळवेढ्याकडे जाणारी एम.एच.१४, जी.एम.९८६७ ही एक कलुझर जीप येताना त्यांना दिसली गाडीच्या समोरील नंबर स्पष्ट दिसत नसल्याने
त्या वाहनाचा संशय आल्याने फिर्यादीने त्यास इशारा करून थांबवले असता चालक तथा आरोपी संतोष लक्ष्मण राठोड हा खाली उतरला.
फिर्यादी म्हणाले, नंबर दिसत नाही दंडात्मक कारवाई त्यांनी करावी लागेल असे फिर्यादी सांगून बाजूस म्हणत असताना आरोपीने कारवाई करण्यास नकार देऊन मी दंड आजपर्यंत भरला नाही व दंड ही करू देणार नाही
असे म्हणत पोलीस शिपायाच्या डावे एक क्रुझर जीप गाडी येताना गालावर जोराची चापट मारून आहे.शासकीय गणवेशात असताना मशिन आदळुन तोडफोड करून १० हजाराचे नुकसान केले.
दरम्यान, आरोपी फिर्यादीच्या अंगाशी झोंबी करीत असताना फिर्यादी पोलिसांच्या ओळखीचे अमोल पवार रा.डोणज हे तिथे येऊन आरोपीस समजावून सांगून बाजूस केले तुम्हा पोलिसांना मारण्याचा अधिकार आहे का ? असे म्हणून मोबाईल शूटिंग करून घेतले सरकारी कामात अडथळा करून अंगावर धावून आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज