मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्किंग ।
कौटुंबिक वादातून निंबोणी (ता. मंगळवेढा) येथे एका औषध निर्माण अधिकाऱ्याला मेहुणे, सासरे, सासू व पत्नीने घरात घुसून पाइप व दगडाने मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांची आई जखमी झाली असून, आरोपींनी रोख ५० हजार रुपये, मोबाइल फोन, बुलेट मोटारसायकल व घराच्या चाव्या असा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून नेला.
ही घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. फिर्यादी धनाजी दशरथ महारनुर (वय ४५, रा. निंबोणी) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी इंद्रजित, हरी, समाधान, जेटू तुकाराम,
चिगुबाई खांडेकर (सर्व रा. शिरनांदगी) व फिर्यादीची पत्नी रुक्मिणी यांनी एकत्रितपणे ही मारहाण केली.
फिर्यादीला बाहेर ओढून आर.पी.व्ही.सी. पाइप व दगडाने मारहाण केली. तसेच त्यांच्या आईलाही मारहाण करून गावकऱ्यांना धमकावण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.25/09/2025 रोजी दुपारी 4.30 वा चे सुमारास फिर्यादी व पत्नी रुक्मीणी असे गावातील घरी होते, त्यावेळी फिर्यादी, पत्नी, आई सुशिला, कामगार जायेद मुलाणी व त्याची पत्नी शाहिन मुलाणी असे. फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीमधला वाद मिटवत बसलो होतो.
त्यावेळी फिर्यादीचे महुने (1) इंदजीत जेटु खांडेकर 2) हरी जेंटु खाडेकर (3) समाधान जटु खांडेकर, सासरे 4) जेटु तुकाराम खांडेकर, सासु 5) चिगुबाई जेटु खांडेकर सर्व रा.शिरनांदगी ता मंगळवेढा हे त्याच्याकडील ईरटीगा कार मध्ये बसुन घराचे समोर आले.
त्यानंतर ते सर्व लोक आमच्या घरामध्ये घुसले. फिर्यादीला उद्देशून तुला लय मस्ती आली आहे नको त्या लोकांना कामावर ठेवले आहे व रुक्मीणीला विनाकरण त्रास देत आहेस तुझी मस्ती जिरवतो असे म्हणून इंदजीत जेटु खांडेकर, समाधान जेटु खांडेकर यांनी फिर्यादीचा हात धरले तसेच हरी जेटु खांडेकर व जेटु तुकाराम खांडेकर यांनी पायाला धरुन मला उचलुन घराचे बाहेर आणले व खाली ठेवले
त्यावेळी हरि खांडेकर व इंद्रजीत खांडेकर या दोघांनी जावुन कारमधील आर. पी. व्ही. सी. पाईप घेवून येवून फिर्यादीच्या डोक्यावर, दोन्ही पायावर, पाठीवर, दोन्ही हातावर मारण्यास सुरवात केली त्यानंतर पत्नी रुक्मीणी धनाजी महारनूर व सासु चिगुबाई जेटु खांडेकर ह्या दोघी मला लाथाबुक्याने माझ्या पोटात, छातीवर व पायावर मारहाण करत होत्या.
तसेच सासरे जेटु तुकाराम खाडेकर यानी तेथेच पडलेला दगड घेवुन माझ्या पाठीवर व हातावर मारण्यास सुरवात केली. त्यावेळी तेथे असलेली फिर्यादीची आई व आमच्या गावातील लोक मला वाचवीण्याकरीता येत असताना हरि खांडेकर व समाधान खांडेकर यांनी माझ्या आईस त्याच पाईपने मारहाण केली आहे व गावातील लोकांना शिवीगाळी करत कोणी जवळ आले तर सोडणार नाही अशी दमदाटी केली.
तसेच पैसे आणि बुलेट मोटरसायकल काढून घेतली म्हणून 1) इंद्रजीत जेटु खांडेकर 2) हरी जेटु खांडेकर 3) समाधान जेटु खडिकर, सासरे 4) जेंद्र तुकाराम खांडेकर, सासु 5) चिगुबाई जेटु खांडेकर सर्व रा. शिरनांदनी ला मंगळवेढा 6) रुक्मीणी धनाजी महारनुर (रा निबोणी) यांचेविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज