टीम मंगळवेढा टाईम्स।
जवळपास १४० कृषी व्यवसाय व उद्योग यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यामध्ये तब्बल १५०० कोटीची अर्थिक उलाढाल असणाऱ्या खते, औषधे व बी- बियाणे कृषी व्यवसायिकांनी शेतकऱ्यांची सेवा म्हणून या उद्योगाकडे लक्ष द्या व शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केली आहे.
आमदार समाधान आवताडे मंगळवेढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील कृषी विभाग व विविध सामाजिक संघटना यांच्या समवेत विचार विनिमय बैठका घेऊन नागरिकांच्या विविध सामाजिक समस्या जाणून घेतल्या.
कृषी विषयक नवीन कायद्यामध्ये योग्य तो बदल करण्यासाठी तालुक्यातील कृषी व्यवसायिकांनी आमदार आवताडे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्यानंतर कृषी व्यवसायिकांच्या सदर प्रश्नांवर लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बैठक लावण्याचे आश्वासन आ.आवताडे यांनी दिले आहे.
गेली अनेक वर्षे मंगळवेढा संतनगरीमध्ये सामाजिक व सांप्रदायिक विकासात्मक विचारधारेतून कार्यरत असणाऱ्या वारी परिवाराच्या विविध मागण्यांचा आ. आवताडे यांनी आढावा घेतला.
शहरातील वाढती जड वाहतूक, शैक्षणिक बाबींच्या विकासासाठी नियोजन, पार्किंगसाठी पुरेसी जागा, शहरांतर्गत स्वच्छता मोहीम, ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांच्या सुरक्षास्तव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, वृक्ष लागवडीचे संवर्धन,
मंगळवेढा संत नगरीला तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आणण्यासाठी उपाययोजना करणे आदी प्रश्नांवर आमदार आवताडे यांनी वारी परिवार या सामाजिक संघटनेशी चर्चा केली. त्यावेळी आमदार आवताडे यांनी मंगळवेढा शहरातील अनेक प्रलंबित प्रश्नांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल वारी परिवाराने आमदार आवताडे यांचे विशेष अभिनंदन केले.
ग्रामीण पातळीवर कायदा आणि सुव्यवस्था यांचे संतुलन अबाधित ठेवून सामाजिक एकात्मता आणि गाव खेड्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य सेवा बजावणाऱ्या पोलीस पाटलांच्या विविध मागण्या व अडचणी
आमदार आवताडे यांनी जाणून घेतल्या व पोलीस पाटलांच्या शासन दरबारी प्रलंबित मागण्यासाठी पोलीस पाटलांचे शिष्टमंडळ घेऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अडचणी सोडविणार असल्याचे आमदार आवताडे यांनी उपस्थिताना आश्वासन दिले.
त्याचबरोबर उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील अर्थकारण सक्षम आणि सजग करण्यासाठी महिला बचत गटाच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील असणाऱ्या प्रेरिका प्रवर्तक महिला भगिनींच्या कार्य सन्मानासाठी विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून
या माता भगिनींना आर्थिक पाठबळ देण्याचा व त्यांच्या समस्या सोडविण्याचा आपण नेहमीच प्रयत्न करू असे सांगितल्यानंतर काही महिलांनी बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करतात ही अडचण सांगितली त्यावेळी प्रांत अधिकारी बी.आर माळी यांना संपर्क साधून सर्व बँक अधिकाऱ्यांची व बचत गटातील प्रमुखांची एकत्रित बैठक लावण्याच्या सूचना आ.आवताडे यांनी दिल्या.
या बैठकीसाठी सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी पंचायत समिती सदस्य संजय पवार,सचिन शिवशरण, विजय माने, चंद्रशेखर कौंडूभैरी, संजय कट्टे, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे,
जिल्हा व्यवस्थापक दयानंद सरवळे रवींद्र भोसले लिंगराज शरणार्थी विलास दुपारगुडे उमेश डांगे नम्रता काटकर सविता खुळे मोनाली कुरवडे, विनायक तवटे,दिगंबर यादव, विलास आवताडे, पांडुरंग जावळे,
प्रा.विनायक कलुबर्मे, सतीश दत्तु, आदी मान्यवर तसेच तालुक्यातील कृषी व्यवसायिक व अनेक शेतकरी, वारी परिवारातील सदस्य, विविध गावांचे पोलीस पाटील व माता भगिनी आणि इतर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज