मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापुरातील डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचे नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणात आरोपी मनीषा माने पोलीस कोठडीत आहे.
या मनिषामुळे डॉ.वळसंगकर यांनी आयुष्य संपवल्याचा उल्लेख त्यांच्या शेवटच्या चिठ्ठीत आहे. नव्या माहितीमुळे आरोपी मनीषा मानेच्या अडचणीत भर पडली आहे.
डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात आरोपी मनिषा मानेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची लवकरच दुसरी बाजू उलगडणार आहे. या आरोपी मनिषा मानेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
कोणती माहिती झाली उघड?
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी मनिषा मानेला पोलिसांनी डॉ.वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणले होते. मनिषा मानेची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणले होते.
आरोपी मनीषा माने हिने डॉ. वळसंगकर यांना धमकीचा मेल पाठवला होता. त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यासाठी आरोपी मनिषाला आणल्याची माहिती मिळत आहे. या चौकशीदरम्यान मोठी माहिती समोर आली आहे.
शेवटच्या चिठ्ठीत डॉ.वळसंगकरांनी कुणावर केला आरोप?
डॉ. शिरीष वळसंगकर यांनी शेवटच्या चिठ्ठीत मनिषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोटारड्या आरोपामुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे.
मुलगा – सुनेने काय जबाब दिला?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या मुलगा आणि सुनेने पोलिसांनी जबाब नोंदवला. डॉ. वळसंगकरांनी काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलची सुत्रे मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती. तर हॉस्पिटलचा संपूर्ण कारभार आरोपी मनीषा मुसळे-मानेकडे होती. तिच्याकडे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी म्हणून पद होते.
हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभाराचा ताण मुलगा आणि सुनेवर वाढला होता. त्यामुळे २०२५ साली डॉ. वळसंगकरांनी पुन्हा हॉस्पिटलची सुत्रे त्यांच्याकडे घेतली. त्यावेळी मनिषाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी वळसंगकरांकडे आल्या होत्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज