टीम मंगळवेढा टाईम्स ।
वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्या कामाची छाप सोडणारे डॉ.शरद शिर्के यांनी पत्नी डॉ.प्रीती शिर्के हिच्यासोबत पुनर्विवाह केला आहे.
शरद शिर्के यांनी पत्नीला हार घालतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
डॉ.शरद शिर्के आणि डॉ.प्रीती शिर्के हे 1996 मध्ये विवाहबंधनामध्ये अडकले होते. 26 नोव्हेंबर रोजी त्यांच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. याच विशेष दिनाचे औचित्य साधत डॉ.शरद शिर्के यांनी पत्नीसोबत पुनर्विवाह केला.
२६ नोव्हेंबर १९९६ रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे डॉ.शिर्के दांपत्याचा विवाह सोहळा साध्या पद्धतीने साजरा झाला होता.आज त्या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाली.
विवाह सोहळ्याच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने डॉ प्रीती शिर्के यांच्या मातोश्री कमल त्रिंबक साळुंखे (चाळीसगाव) व काही निवडक मित्रमंडळींनी जून्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या करण्यासाठी ही पुन्हा विवाह करण्याची कल्पना मांडली सत्यात ती उतरली.
मग लग्नाच्या तयारीसाठी सर्वांचीच धावाधाव सुरू झाली. ज्या ठिकाणी विवाह होणार संपन्न होणार होता त्या ठिकाणी २५ वर्षांपूर्वीचे व सध्याचा आठवणींचे फोटो डिजीटल स्वरूपात संपुर्ण हॉल मध्ये लावण्यात आले होते.
यावेळी सुरसंगम ग्रुपचे प्रमुख दिगंबर भगरे यांच्यासह त्यांच्या संतोष ढावरे , लहू ढगे, नितीन बाभळे, भाऊ उन्हाळे, नवनाथ सावळे व हर्षवर्धन चव्हाण यांनी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद अजीज के नगमे हा कराओके गाण्यांचा ट्रॅक शो अतिशय उत्तमरित्या सादर करून उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली.
नवरदेव डॉ.शरद शिर्के यांचे मामा म्हणून नाट्यपरिषदेचे यतीराज वाकळे व डॉ.प्रीती शिर्के यांचे मामा म्हणून म.सा.प.चे अध्यक्ष प्रकाश जडे हे उभे राहीले.
सर्व सुरळीत पार पडल्यानंतर हजरत काझी व अन्य काही मान्यवरांनी मंगलष्टका सादर करून विवाह साजरा केला. या अनोख्या विवाह सोहळ्यासाठी डॉ शिर्के दांपत्य या दोन्हीकडील पाहूणे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी सातारा, कोरेगाव, चाळीसगाव, जत, पंढरपूर, मंगळवेढा यासह विविध भागातील पाहूणे उपस्थित होते.
अत्यंत खडतर परिस्थिती व कष्टातून पुढे आलेल्या डॉ शिर्के दांपत्यांचे डोळे यावेळी आनंदाने भरलेले दिसले.
अशा पध्दतीने डॉ शरद शिर्के व डॉ प्रीती शिर्के यांचा विवाह सोहळा अनोख्या पध्दतीने गोरज मुहूर्तावर साजरा झाला. विवाह सोहळ्याचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज