टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहरात सध्या चार पुरुष तर सात महिला, असे एकूण ११ कोरोनाचे रुग्ण आहेत. दुसरीकडे ग्रामीणमध्ये २३ पुरुष आणि २६ महिला पॉझिटिव्ह आहेत.
दरम्यान, गुरुवारी पाच्छा पेठेतील ३८ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पूर्वीचे गंभीर आजार असतानाही तो युवक उपचारासाठी विलंबाने दाखल झाला होता.
जानेवारी २०२३ मध्ये काही वर्षे कोरोनामुक्त राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
पण, दिलासादायक बाब म्हणजे कोरोना बाधित व्यक्तींमध्ये तीव्र किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणे आढळलेली नाहीत. मागील दोन महिन्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची स्थिती आहे.
गुरुवारी सोलापूर शहरातील मृत झालेल्या तरुणाला मधुमेह होता. त्याला दोन्ही किडनीची समस्या होती. त्याची अँजिओप्लास्टी देखील झालेली होती.
१६ एप्रिलला त्या तरुणाला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. तरीसुद्धा तो तरुण १८ एप्रिल रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला.
दवाखान्यात त्याने जवळपास ३८ तास मृत्यूशी झुंज दिली. पण, तो अपयशी ठरला आणि २० एप्रिलला त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोना नाही, तो गेला, काहीही होत नाही लगेच बरे होतो, असा गैरसमज न बाळगता संशयितांनी ताबडतोब उपचार घ्यावेत.(स्रोत;सकाळ)
लक्षणे असल्यास विलंब नकोच
कोरोनासंबंधीची लक्षणे असलेल्यांनी तत्काळ टेस्ट करून घ्यावी. त्यानंतर कोणताही वेळ न दवडता तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे. को-मॉर्बिड (पूर्वीचे गंभीर आजार असलेले) रुग्णांनी त्यासंदर्भात खबरदारी घ्यायला हवी.
शक्यतो त्या व्यक्तींनी गर्दीत जाऊ नये, मास्कचा वापर करणे जरुरी आहे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज