टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकवर्गणीतून उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून यासाठी मुस्लिम समाजाचे बबलु सुतार यांनीही ११ हजार रूपयांची देणगी दिली आहे.
बबलु सुतार हे कर्मयोगी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक असून सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सदरची रक्कम त्यांनी संयोजन समितीकडे सुपूर्द केली.
यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे माजी अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, राहुल सावंजी, सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संभाजी घुले, उद्योजक कन्हैय्या हजारे, किशोर दत्तु आदि उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज