टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात एका 9 वर्षीय मुलीस खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून वाईट उद्देशाने दवाखान्यात नेवून तीच्यावर बळजबरी अत्याचार केल्याची घटना घडली असून
या प्रकरणी एका खाजगी डॉक्टरविरूध्द गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी डॉक्टर हरिप्रसाद पत्की (रा.सलगर बु.) याला तात्काळ गजाआड केले आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील 9 वर्षीय मुलगी दि.2 रोजी दुपारी 1.30 वा. खाजगी शिकवणीला जात असताना तीला बोलावून
खाऊसाठी पैशाचे आमिष दाखवून दवाखान्यात नेवून जबरी संभाेग केला असल्याची फिर्याद पिडीत मुलीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केल्यावर डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरिक्षक रणजित माने यांनी सलगर येथे जावून रातोरात आरोपीस गजाआड केले आहे. या घटनेने त्या डॉक्टरच्या कृत्याबाबत संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी आरोपीस अद्दल घडविण्यासाठी चांगला चोप दिल्याचीही चर्चा आहे. आरोपीविरूध्द भा.दं.वि.376 अ,ब,बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण,
व अनुसूचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा अधिक तपास डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील या करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज