टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्मॉल बिजनेस करा आणि पैसे कमवा .. अशी टॅगलाईन घेऊन एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात पाहून फसला आणि साडेआठ लाख रुपयांना मुकल्याची घटना सोलापुरात घडली.
या घटनेची हकीकत अशी की, शंकर नारायण फलमारी ( वय ४० , रा . भगवान नगर झोपडपट्टी , पोलीस मुख्यालय , सोलापूर ) यांनी सोलापुरातील एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आकर्षक जाहिरातीवर विश्वास ठेवून पत्रावळी,
द्रोण , कप ग्लास असे साहित्य बनवण्याच्या मशीन घेण्यासाठी जाहिरातीत प्रसिद्ध झालेल्या आरोपी योगेश यांच्याशी संपर्क साधून त्याच्या अकाउंटवर मशीन घेण्याकरिता वेळोवेळी पैसे भरले.
३१ जुलै २०२१ ते १२ डिसेंबर २०२१ पर्यंत वेळोवेळी ५ लाख ४५ हजार ६०० रुपये भरले. तसेच कच्च्या मालाच्या खरेदीसाठी २ लाख ५० हजार रुपये रोख,
मशीन ट्रान्स्पोर्ट खर्चाकरिता ३६ हजार ४०० असे एकूण ८ लाख ३२ हजार रुपये भरले. मशीन देतो असे सांगून आरोपीने फक्त मशीनचा सांगाडाच देऊन फिर्यादीची फसवणूक केली.
जेलरोड पोलीस ठाण्यात आरोपी योगेश ( पूर्ण नाव माहीत नाही , राहणार आझादपूर नवी दिल्ली ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोतेकर हे करीत आहेत. (स्रोत; पुण्यनगरी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज