mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धन-धान्याची बरकत! दिवाळीत लक्ष्मी पूजनाची सर्वोत्तम वेळ, महत्त्व, घर, ऑफिसमधील पूजेचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या…

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 12, 2023
in राष्ट्रीय
दीपावलीत लक्ष्मीपूजन कसे करावे?; जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि विधी

टीम मंगळवेढा टाईम्स।

दिवाळी लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील महत्वाची पूजा मानली जाते. लक्ष्मीपूजन हा दिवस अत्यंत जल्लोषात साजरा केला जातो. आश्विन महिन्यातील अमावास्येला संध्याकाळी ही पूजा दरवर्षी प्रथेप्रमाणे केली जाते.

यावर्षी लक्ष्मीपूजन 12 नोव्हेंबर म्हणजेच आज केलं जाणार आहे. दिवाळीमध्ये लक्ष्मी पूजनाला अधिक महत्त्व दिले जाते. हा दिवस व्यापारी वर्गासाठी फार महत्त्वाचा असतो. यावेळी ते विशेष चोपडी पूजन देखील करतात. हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे.

लक्ष्मीकुवेर पूजन हे अमावस्येला करायचं असतं. पण ती अमावस्या जेव्हा संध्याकाळी असते तेव्हा त्या संध्याकाळी असलेल्या अमावस्येला ते करायचं असल्यामुळे 12 नोव्हेंबरलाच नरक चतुर्दशी या दिवशी संध्याकाळी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे.

हे लक्ष्मीपूजन आपल्याकडे असलेल्या लक्ष्मीच्या प्रतिमेचं, त्या मूर्तीचं त्या फोटोचं किंवा चलनी नाणे जो पैसा आपण व्यवहारात वापरतो त्याचं आपल्याला पूजन या दिवशी करायचं आहे. या लक्ष्मीची प्रार्थना आपल्याला करायची आहे कारण ही लक्ष्मी चंचल आहे. या लक्ष्मीने आपल्या घरी स्थिर राहावं, आपल्याला सुख द्यावं, ऐश्वर्य द्यावं यासाठी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीचं पूजन करावं.

इतर अनेक वेळेला अमावस्या अशुभ मानली जाते. पण ही लक्ष्मीपूजनाची अमावस्या मात्र मोठ्या आनंदात आपण सगळीकडे साजरा करतो. आणि असं लक्ष्मीपूजन घरोघरी दुकानामधून आपल्या व्पापार वृद्धीसाठी हे केलं जातं. तेव्हा लक्ष्मीपूजन लोकांनी संध्याकाळी सूर्यास्तानंतर रात्री 11 वाजेपर्यंत आपल्याला करता येईल.

लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त

रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 5 वाजून 31 मिनिटांनी ते रात्री वाजून 36 मिनिटांपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये तुम्ही देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करू शकता.

लक्ष्मीपूजनाची विधी :

लक्ष्मीपूजनच्या दिवशी व्यापारी हे आपली चोपडी पूजन करुन आपल्या व्यवसायाच्या नव्या वर्षाची सुरुवात करतात. त्यासाठी ते नव्या वहीची (चोपडी) विधीवत पूजा करतात. यालाच चोपडी पूजन असं म्हटलं जातं. यावेळी घरोघरी लक्ष्मीचं देखील पूजन केलं जातं.

घरातील पैसे, सोने-नाणे हे देवीच्या फोटोसमोर मांडून त्याची पूजा केली जाते. या दिवशी अंगाला उटणे लावून आंघोळ करतात. या दिवशी लक्ष्मीची यथासांग पूजा करून, घरासमोर सुशोभित रांगोळी काढून, दारी झेंडूच्या माळा लावून, फराळाचा, लाह्या, बत्तास्यांचा नैवेद्य दाखवून अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन केले जाते.

लक्ष्मीपूजनाची परंपरा

अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. महाराष्ट्रात लक्ष्मी पूजनाला भेंड, बत्तासे, साळीच्या लाह्यांचा नेवैद्य दाखवण्याची पद्धत आहे. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात.

या दिवशी लोक स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात. केरसुणीने घर स्वच्छ होऊन घरातील दारिद्य्र दूर होते असे मानले जाते.

कार्तिक अमावस्या तिथी सुरू होते – 12 नोव्हेंबर 2023, 02:45 दुपारी

कार्तिक अमावस्या तिथी समाप्त होते – 13 नोव्हेंबर 2023, 02:57 दुपारी

लक्ष्मी पूजनाची शुभ वेळ,

लक्ष्मी पूजनाची सर्वोत्तम वेळ – 05:40 सायंकाळी ते 07:36 सायंकाळी,

प्रदोष काळ (आरोह) – 05:34 सायंकाळी – 08:08 सायंकाळी,

वृषभ लग्न – 05:48 सायं – 07:45 सायं

महानिष्ठ काल मुहूर्त सिंह लग्न :- मध्यरात्री 12.18 ते पहाटे 02.34

व्यवसाय स्थापना पूजा मुहूर्त अभिजित मुहूर्त – सकाळी 11:47 ते दुपारी 12:33 शुभ चोघडिया – दुपारी 01:31 ते 02:51 विजय मुहूर्त – दुपारी 2:11 ते 2:55

गृहस्थांसाठी पूजेची वेळ लक्ष्मी पूजनाची सर्वोत्तम वेळ – 05:40 सायं ते 07:36 सायं, प्रदोष काळ (उभारणी) – 05:34 सायं – 08:08 सायं, वृषभ राशी – 05:48 सायं – 07:45 सायं पर्यंत

दिवसाची सर्वोत्तम वेळ : चार-लाभ-अमृत चौघडिया – सकाळी 08:08 ते दुपारी 12:11 अभिजित मुहूर्त – 11:47 ते 12:33 शुभ चौघडिया – दुपारी 01:31 ते 02:51 पर्यंत

रात्रीची सर्वोत्तम वेळ: शुभ-अमृत-चारची चौघडिया – संध्याकाळी 05:34 ते रात्री 10:31, लाभची चोघडिया – मध्यरात्री 01:50 ते 03:29, शुभाची चौघडिया – मध्यरात्री 05:08 ते 06:06 सकाळी 48 पर्यंत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लक्ष्मीपूजन

संबंधित बातम्या

बापाचे पाऊल वाकडे पडले,मुलाने त्याला यमसदनी धाडले; बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले

धक्कादायक! मुलीच्या कमाईवर जगत असल्याच्या टोमण्यांमुळे वडिलांकडून मुलीची हत्या

July 13, 2025
मंगळवेढा ‘या’ ग्रामपंचायतीची स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट; आजी-माजी सैनिकांना कर सवलत देण्याचा केला ठराव

Bharat Bandh : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद; कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

July 9, 2025
चिंता वाढली : मंगळवेढ्यात कोरोनाचा दहावा बळी; 35 वर्षीय महिलेचा मृत्यू

हृदयविकारामुळे मृत्यूचा ‘या’ लसीशी कोणताही संबंध नाही; अचानक ‘हार्ट ॲटॅक’ मागे अनेक कारणे; केंद्र सरकार दिले स्पष्टीकरण

July 3, 2025
खिशावर डल्ला : सलग १२ व्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ, हे आहेत आजचे दर

नागरिकांनो! आजपासून ‘या’ वाहनांना पेट्रोल- डिझेल मिळणार नाही, का आणि कुठे घेण्यात आला निर्णय? पेट्रोल पंपावर असणार कडक नजर

July 1, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

बाबो..! स्विस बँकेत भारतीयांचा पैसा तिप्पट वाढला; आकडा ऐकून डोकं गरगरेल

June 24, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

आनंदाची बातमी! गृह आणि कार लोन झालं स्वस्त; व्याजदरात मोठी कपात; कर्ज घेतलेल्यांना होणार मोठा फायदा

June 16, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

लंडनमधली मुलाची भेट अधुरी राहिली, अहमदाबादमध्येच घात झाला; सांगोलच्या ‘या’ वृद्ध दाम्पत्याचा करुण शेवट

June 13, 2025
मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू;AP वृत्तसंस्थेचं हादरवणारं वृत्त

June 12, 2025
Next Post
देदिप्यमान! मंगळवेढा-रायगड सायकल मोहिमेचे ‘या’ दिवशी होणार प्रस्थान; वारी परिवाराचा अनोखा उपक्रम

देदिप्यमान! मंगळवेढा-रायगड सायकल मोहिमेचे 'या' दिवशी होणार प्रस्थान; वारी परिवाराचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 14, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर ताण, लाडकी बहीण योजना बंद होणार? मिसेस मुख्यमंत्री म्हणाल्या…

July 14, 2025
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

खबरदार! ‘या’ तारखेला आंतरवाली सोडली तर मागे सरकणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस सरकारला इशारा

July 14, 2025
दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

दैदिप्यमान सोहळा! रोटरी क्लब ऑफ मंगळवेढा सिटीचा आज पदग्रहण समारंभ; प्रेसिडेंट व सेक्रेटरी म्हणून यांची निवड करण्यात आली

July 13, 2025
महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे कामाचे तास कमी होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्य राखीव पोलिस दलात आता महिलांना संधी मिळणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन नियमित पदे निर्माण करण्यास दिली मान्यता

July 14, 2025
गुड न्युज! चंद्रभागा शुद्धीकरणासाठी मोदी सरकारने उचलले मोठं पाऊल; आमदार आवताडेंची माहिती

मोठी खळबळ! मंदिर समितीच्या दर्शन मंडपाचा ठेका मिळवून देतो म्हणून विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकावर लाचेचा गंभीर आरोप; फसवणूक झालेल्या व्यावसायिकांने पोलिसात दिली तक्रार

July 13, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा