रस्त्याचे काम बंद करू नका, लवकरच मोबदला मिळेल, जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आश्वासन
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष अॅड.नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून चर्चा केल्याने बाधित शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी हे शुक्रवारी मंगळवेढयाला येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक शेतकरी आतुरतेने वाट पहात होते अखेर जिल्हाधिकारी मंगळवेढयात दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अॅड नंदकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना भेटले.
यामध्ये मारुती वाकडे , भारत दत्तू , सत्तार खतीब , अशोक चेळेकर , ज्ञानेश्वर कोंडुभैरी आदीनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. व त्यांचेसोबत बाधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याबाबतची मागणी उचलून धरली.
यावेळी अॅड.पवार यांनी मंगळवेढा प्रांत कार्यालयामध्ये बाधित शेतकऱ्यांकडून २१ डिसेंबर २०२० रोजी रस्त्याचे काम बंद करण्याचे निवेदन दिले.
सदर प्रसंगी प्रांताधिकारी हे गेल्या दोन वर्षापासून मंगळवेढा येथील बाधित शेतकऱ्यांना मोबदल्यापासून कसे पध्दतशीर वंचित ठेवून त्यांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास दिला याचे सविस्तर वर्णन जिल्हाधिकाऱ्यांसमोर केले तसेच काझी व त्यांचे कुलमुखत्यार हे स्वतः कधीही प्रांत कार्यालयात येत नाहीत.
त्यांचे वकिल हजर रहात नाहीत, तरीसुध्दा त्यांनी दिलेले अर्ज ग्राह्य धरून विनाकारण संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल दुष्काळी परिस्थिती असतानासुध्दा अधिग्रहित झालेल्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना मिळू दिला नाही.
प्रांताधिकारी स्वतः मंगळवेढा येथील उपविभागीय कार्यालयात रुजू झाल्यापासून त्यांनी मंगळवेढयातील शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही. ते स्वः ऑफिसमध्ये नसतात , सर्व कामकाज कोरोना महामारीच्या नावाखाली रेस्टहाऊसमध्ये बसून चालवितात.
व शेतकऱ्यांना कोर्ट मॅटर आहे असे सांगतात . तत्पुर्वी ज्यावेळी हा वाद हायकोर्टात गेला नव्हता त्यावेळीसुध्दा त्यांनी बाधित शेतकऱ्यांना कोणताही जमिनीचा मोबदला दिला नाही.व रस्त्याचे काम सुरळीत चालू आहे.
एकाही शेतकऱ्याकडून जमिनीचा मोबदला देवून हायवे अथॉरिटीने ताबा घेतला नसून बेकायदेशीर काम सुरु आहे. काझीने दिलेल्या अर्जात कोणत्याही शेतकऱ्याच्या जमिनीसंदर्भात स्पष्ट उल्लेख नसताना प्रांताधिकाऱ्यांनी स्वतःच्या अधिकाराचा दुरुपयोग करून शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले आहे. अशा विविध तक्रारी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या.
सदर दोन वर्षामधील सर्व प्रकार जिल्हाधिकारी यांनी दोन तास वेळ देवून सविस्तरपणे ऐकला ल. व रस्त्याचे काम बंद करू नका , लवकरच योग्य निर्णय घेवू असे आश्वासन शिष्टमंडळास दिले.
त्यानंतर बाधित शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास बेकायदेशीर असलेले काम बंद करण्याचा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिला आहे.
यावेळी जावेद खतीब, प्रविण हजारे, राजाराम सुर्यवंशी, विजय बुरकूल, जनार्धन कोंडुभैरी, रतीलाल दत्तू, बाळू मुजावर, सुधीर गवळी, दादा गुंगे, शिवाजी वाकडे, ईश्वर वाकडे, जयराज शेंबडे, जनार्धन कोंडुभैरी, दिलावर मुजावर, जनार्धन डोरले, सुधीर जाधव, यतिराज मर्दा, अरूण दत्तू, आण्णा दत्तू, गजानन हजारे यांचेसह गणेशवाडी, आंधळगाव, माचणूर, मंगळवेढयाचे शेतकरी उपस्थित होते.
उद्या उच्च न्यायालयात सुनावणी
जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे म्हणणे सविस्तर ऐकून कागदपत्रांची तपासणी केली. त्याबद्दल त्यांचे आभार. १५ डिसेंबरला याबाबत उच्च न्यायालयात तारीख आहे. महसूलमंत्री यांचेकडील कामकाजही लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.-अॅड.नंदकुमार पवार अध्यक्ष, मंगळवेढा तालुका काँग्रेस कमिटी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज