मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दौरा सुरू होण्याआधीच अक्कलकोट तालुक्यातील सांगवी येथील ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. Dissatisfaction even before CM’s visit to Solapur; Uddhav Thackeray should come to the spot and see our loss
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापुरात आलेले आहेत.सांगवी येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून नुकसानग्रस्तांची संवाद साधनार होते.
पण नुकसान झालेल्या ठिकाणी न जाता बोरी नदीच्या पुलावर ग्रामस्थांना बोलावल्याने गावातील नागरिकांनी पुलावर जाण्यास विरोध दर्शविला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमच्या झालेल्या जाग्यावर येऊन आमचं नुकसान पाहावं पुलावर आम्ही जाणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
नुकसानग्रस्त भागासाठी मुख्यमंत्री काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या पाहणी दौऱ्याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (CM Uddhav Thackeray visit flood-affected Solapur district Live Update)
त्यानंतर सकाळी 10.15 वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटगाव आणि अपसिंगा येथे अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी करतील. तसेच शेती पिकांच्या नुकसानीची ते पाहणी करतील. त्यानंतर तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पूरपरिस्थितीबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा करतील. त्यानंतर दुपारी 1.45 वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते सोलापूरच्या दिशेने रवाना होतील.
सोलापूरनंतर मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा
तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूर दौऱ्यानंतर बुधवारी (21ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्ष विभागाने मुख्यमंत्री हे बुधवारी उस्मानाबाद जिल्हा दौरा करणार असल्याची माहिती दिली. (CM Uddhav Thackeray Visit flood-affected Solapur district Live Update)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज