mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

दोन दादांच्या भेटीने जिल्ह्यात नव्या समीकरणाची चर्चा; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव पडेल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 8, 2023
in राजकारण, सोलापूर
दोन दादांच्या भेटीने जिल्ह्यात नव्या समीकरणाची चर्चा; सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव पडेल

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडून शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून सहभागी झालेले अजित पवार यांची भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेत त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ADVERTISEMENT

खरं तर राष्ट्रवादी सोडल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पवारांपासून लांब राहणेच पसंत केले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी भोर तालुक्यातील एका कार्यक्रमात हे दोघे एकत्र आले होते.

एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका पार पाडणारे मोहिते पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील त्यावेळी इच्छुक होते मात्र, जिल्ह्यातील दुसऱ्या गटाकडून त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेण्यात येत होता. ताकद असूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असणाऱ्या कोंडीतून बाहेर पडण्याचा आग्रह रणजितसिंह मोहिते पाटील हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे करत होते.

राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून जिह्यातील दुसऱ्या गटाला ताकद देण्यात येत होती, दुसरीकडे आपल्याला डावलण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना मोहिते पाटील यांच्यात बळावत होती. त्यातच माढ्यातून तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच रणजितसिंह मोहिते पाटील यांनी लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला

थोरल्या पवारांपेक्षा अजितदादा पवार यांच्याकडून आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ दिले जात आहे असा आक्षेप मोहिते पाटील गटाचा होता. खुद्द मोहिते पाटील यांनी कधीही केला नाही. मात्र समर्थकांचा तसा आक्षेप होता.

त्यातूनच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, आज त्याच अजित पवार यांची रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भेट घेतल्याने सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.

भाजप मध्येही मोहिते पाटलांची गेल्या काही दिवसांपासून कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकद लावून निवडून आणले त्या निंबाळकरांशी मोहिते पाटील यांचे किती सख्य आहे, हे अख्खा सोलापूर जिल्हा जाणून आहे. एकाच पक्षात असून त्या दोघांचेही थोडेही जमत नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.

या मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते पाटील लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी दोन रणजितसिंहांमध्ये स्पर्धा आहे. हा मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपकडे आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये हा राष्ट्रवादीकडे होता त्यामुळे माढ्यातून इच्छुक असलेल्या रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी अजित पवार यांची भेट घेणे हे सूचक मानले जात आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये फूट पडल्यानंतर माळशिरस तालुक्यातील पक्षाचे नेते उत्तमराव जानकर यांनी अजित दादा पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर तालुक्यातील दुसरे मातब्बर नेते रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही अजित पवार यांची भेट घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. हे दोन्ही राजकीय विरोधक एकाच म्यानात कसे समाविष्ट होणार असा प्रश्न सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाला पडलेला आहे.

गेल्या लोकसभेला माळशिरस तालुक्यातून एक लाखापेक्षा अधिक मताचे लीड रणजितसिंह निंबाळकर यांना मोहिते पाटील यांनी दिले होते. मात्र, अवघ्या सहा महिन्यांनंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पण राष्ट्रवादीच्या उत्तमराव जानकर यांचा अवघ्या साडेतीन हजार मतांनी पराभव झाला होता,

त्यामुळे हे दोन्ही नेते एकमेकांशी जुळवून घेणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. रणजितसिंह मोहिते पाटील यांची ही भेट सदिच्छा भेट आहे की आगामी काळातील काही राजकीय घडामोडींची चाहूल देणारी आहे, हे लवकरच स्पष्ट होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अजित पवाररणजितसिंह मोहिते पाटील
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

September 28, 2023
संतापजनक! मंगळवेढ्यात जीप चालकाने पोलीसाच्या श्रीमुखात भडकावली; चालकाविरूध्द गुन्हा दाखल

धक्कादायक! गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिस अधिकाऱ्यास मारहाण; संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

September 27, 2023
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत द्या माहिती; ‘हा’ टोल फ्री नंबर जारी; कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

September 27, 2023
मंगळवेढ्यात ‘खून का बदला खून’ मधील तिघांची निर्दोष मुक्तता; वाचा सविस्तर बातमी

धनगर आरक्षण आंदोलन! सीईओ कार्यालय तोडफोड प्रकरणी मंगळवेढ्यातील ‘या’ दोघांना जामीन

September 26, 2023
संतांच्या विचाराचा प्रसार! पंढरीत रंगणार संत नाटकांचा आविष्कार; श्री सदानंद महाराज मंडळाच्यावतीने मोफत आयोजन

संतांच्या विचाराचा प्रसार! पंढरीत रंगणार संत नाटकांचा आविष्कार; श्री सदानंद महाराज मंडळाच्यावतीने मोफत आयोजन

September 26, 2023
बडा मासा! मंगळवेढा प्रांत कार्यालयातील तलाठी निघाला लाचखोर; लाचेची रक्कम घेऊन केला पोबारा; लाच कुणाच्या सांगण्यावरून?

शेतीच्या मोजणीसाठी पैसे घेताना भूमापक जेरबंद; भूमी अभिलेख कार्यालयात लाचलुचपतची कारवाई

September 26, 2023
मोठी बातमी! सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये 674 पदांसाठी निघाली बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज करता येणार

धडक मोहिम! सोलापूर जिल्ह्यातील साडेपाच हजार लाभार्थ्यांवर शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी कारवाईसह, त्यांच्याकडील पैसे व्याजासह वसूल करण्याचा प्रस्ताव…

September 26, 2023
अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

अभिनंदनास्पद! भैरवनाथ शुगर उद्योग समूहास औद्योगिक उत्कृष्टता पुरस्कार; पुणे येथील कार्यक्रमात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते प्रदान

September 25, 2023
दूधास एफआरपी लागू करा! गाईच्या दुधास ४०, म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर भाववाढ द्या, मगच आषाढी पूजेला या; मुख्यमंत्र्यांना इशारा

दुधाच्या दरात पुन्हा ‘इतक्या’ रुपयाने कपात; गायीच्या दुधाला ३२ ते ३३ रूपये दर; शेतकऱ्याचे आर्थिक नियोजन कोलमडले

September 24, 2023
Next Post
सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

ना टायर्ड हूॅं, ना रिटायर्ड हूॅं, मैं तो फायर हूॅं; वय झाले असल्याच्या टिकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

ताज्या बातम्या

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

मोठी बातमी! मनोज जरांगे-पाटील सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, मराठा आरक्षण संदर्भात संवाद साधणार; असा असेल दौरा.. मंगळवेढा, पंढरपूर

September 28, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील ओढ्यावरील पुलाला साडेतीन कोटी मंजूर, दळणवळणाचा मार्ग सुकर होणार; आ.आवताडे

September 28, 2023
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील ‘या’ मोठ्या ज्वेलर्समध्ये सोन्याच्या दागिन्यांची चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

September 27, 2023
कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

कौतुकास्पद! पहिल्याच प्रयत्नात दामाजीला ‘ब’ वर्ग मिळाला; कारखान्याची 35 वी वार्षीक सर्वसाधारण सभा संपन्न; चेअरमन शिवानंद पाटील यांची माहिती

September 27, 2023
अलर्ट! राज्यात आता एका जुन्हा व्हायरसने चिंता वाढवली; 7 दशकांपूर्वीच्या व्हायरसची एन्ट्री; जाणून घ्या किती धोकादायक

सावधान! डीजेच्या दणदणाटाने घेतला दोघांचा जीव; मिरवणुकीत नाचताना जागीच कोसळले

September 28, 2023
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

आत्मगजानन! महाराष्ट्रातील एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे ‘त्या’ गावाची परंपरा? वाचा सविस्तर

September 28, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा