टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व तालुक्यातील समविचारी आघाडीने महायुतीचे उमेदवार आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा जाहीर केले असल्याची माहिती पक्षनेते अजित जगताप यांनी दिली आहे.
दरम्यान, या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व समविचारी आघाडीची विचार विनिमय बैठक पार पडली. विधानसभा होणाऱ्या निवडणुकी संदर्भात काय भूमिका घ्यावी याबाबत कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली होती.
बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या भावना व विचार ऐकून आमदार समाधान आवताडे यांना पाठींबा दिला असल्याचे अजित जगताप म्हणाले.
2021 चे पोटनिवडणूक मध्ये भगीरथ भालकेंना तन मन धनाने मदत करूनही त्यानंतरच्या काळामध्ये पदाधिकाऱ्यांना हटवण्यासाठी त्यांनी वरिष्ठांकडे प्रयत्न करून शहर अध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांना पदावरून हटविले.
त्यानंतरच्या काळामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासाठी रात्र आणि दिवस करून निवडणुकीमध्ये काम केले त्या पदाधिकर्यावराती गुन्हे दाखल करण्याकरिता पोलिस स्टेशन मध्ये फोन केले.
त्यानंतरच्या काळामध्ये साखर कारखाना निवडणुकीमध्ये समविचारी आघाडी स्थापन करून सर्वांनी एकत्रितपणे काम करून निवडणूक जिंकली व त्यानंतरच्या काळामध्ये साखर कारखाना स्वीकृत सदस्य निवड नाव सुचवताना कोणाशीही चर्चा न करता भगीरथ भालके यांनी नाव सुचविले व
गेली 2 वर्षे त्यांनी कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवला नाही व त्यांचा अडचणी जाणून घेतल्या नाहीत. त्यामुळे सर्व पदाधिकाऱ्यांनी भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्यास विरोध दर्शविला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकार मध्ये सामील झाल्यानंतर मंगळवेढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे पुतळा सुशोभीकरण करणे
तसेच आतार- बागवान – तांबोळी स्मशानभूमी सुशोभीकरण करणे,भीमनगर येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे तसेच मंगळवेढा शहरामध्ये अद्यावत संस्कृतिक भवन बांधणे, शहरातील विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र बांधणे व इतर कामाकरीता सुमारे 10 कोटी रुपये निधी राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे दिला आहे.
तसेच विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे. त्यामुळे तुम्ही पदाधिकारी तुमच्यातील व आमदार आवताडे यांच्यातील वाद मिटवून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत व आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याबाबत उपस्थित सर्वांनी हात वर करून पाठिंबा दिला.
त्यानंतर मुजमिल काझी यांनी त्यांच्यावरील पदाधिकारी निवडीत झालेला अन्याय व शरद पवार गटांमध्ये उमेदवारीवरून शहरात सुरू असलेल्या आर्थिक देणे घेणे वरती भाष्य केले. अजितदादांनी मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीसाठी जास्त जागा दिले आहेत
व नुकत्याच राज्यपाल निवडणुकीत आमदार करून मुस्लिम समाजाला न्याय दिल्याने आम्ही यामुळे अजित दादा गटाचे काम करणार असल्याचे सांगून आमदार समाधान आवताडे यांना पाठिंबा देण्याची मागणी केली यावेळी माऊली कोंडुभैरी, सोमनाथ बुरजे,ज्ञानेश्वर भगरे, शिवानंद पाटील ,प्रवीण खवतोडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे विधानसभा अध्यक्ष अजित जगताप यांनी पोट निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांसोबत झालेला अन्यायाबाबत भाष्य करून आपल्याला गेली दोन वर्ष शहराचा विकास करीत असताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मोठ्या प्रमाणात मदत केल्याची भावना व्यक्त केली.
सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यानुसार विद्यमान आमदार समाधान दादा आवताडे यांना भविष्यात शहराच्या विकासासाठी पाठिंबा देण्यावर वरिष्ठांशी चर्चा करून दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी रतनचंद शहा बँकेचे व्हाईस चेअरमन रामचंद्र जगताप ,माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, नगरसेविका सब्जपरी मकानदार, नगरसेवक अजित जगताप, नगरसेवक प्रवीण खवतोडे, नगरसेवक दीपक माने ,
नगरसेवक राहुल सावजी, नगरसेवक बशीर बागवान,ओबीसीं चे जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार ,माजी अध्यक्ष मुजमील काझी ,संभाजी घुले किशोर दत्तू, माऊली कोंडुभैरी, बिलाल बागवान, सुभाष भंडारे ,पिंटू मुरडे, राजेंद्र जाधव ,
अनिल मुद्गुल बाळू नागणे, विक्रम भगरे ,विनायक दत्तू ,हर्षद डोरले ,रशीद तांबोळी, सिद्धार्थ लोकरे, नागेश भगरे ,सागर खरबडे ,बशीर मुलाणी , शशी साखरे मिलिंद ढावरे ,माधुरी हजारे ,संगीता रजपूत,मेटकरी ,चव्हाण उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज