टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने सादर करण्याची मुभा दिली आहे.
तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढविण्यात आली आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.
राज्यभरातील जवळपास 7, 751 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. 2 डिसेंबर रोजी निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अर्ज भरताना तांत्रिक अडथळा येत आहे. ग्रामीण भागात उमेदवारांना या समस्येला सामोरं जावं लागत आहे.
अशावेळी विविध ठिकाणी सायबर कॅफेवर इच्छुकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी जमत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी राज्यभरातून केली जात आहे.
याबद्दल मदान यांनी सांगितले की, राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती.
त्यानुसार दि.28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या कालावधीत संगणक प्रणालीद्वारे नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यात आता अंशत: दुरूस्ती करून नामनिर्देशनपत्र पारंपरिक म्हणजेच ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज