टीम मंगळवेढा टाईम्स।
धनश्री पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व धनश्री मल्टीस्टेट या संस्थेच्या निमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन 10 जानेवारी रोजी करण्यात आल्याची माहिती धनश्री पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ.शोभा काळुंगे यांनी दिली.
मंगळवेढा तालुक्यातील बँकिंग क्षेत्रामध्ये श्री धनश्री परिवाराचे प्रमुख शिवाजीराव काळुंगे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या धनश्री पतसंस्था, धनश्री मल्टीस्टेट आणि सिताराम महाराज क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून तालुक्यातील अर्थकरणाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली.
बाराशे कोटीपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी या संस्थेच्या माध्यमातून जमा करण्यात आल्या. मंगळवेढा तालुक्यातील अनेक बेरोजगारासह साखर कारखानदारी जिवंत ठेवण्यात त्यांनी योगदान दिले.
याच संस्थेच्या रौप्य महोत्सवी आणि तपपुर्ती कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, उखाणे स्पर्धा, मलाही थोडं बोलू द्या या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये सहभागी महिलांना रोख रकमेची पारितोषिक देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
सहभागी महिलांनी राणी उन्हाळे मो.7387957413 ,सुवर्णा ढगे मो.8080536090,अनिता डांगे मो.9604589905,सविता यादव मो.9766460200 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज