mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विकासात्मक दूरदृष्टी! आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या ३ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 26, 2023
in मंगळवेढा

टीम मंगळवेढा टाईम्स। 

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांतून मंगळवेढा शहरामध्ये मंजूर झालेल्या तब्बल ३ कोटी निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आ आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

सदर विकास कामांमध्ये बोराळे नाका ते सांगोला नाका रस्ता सुधारणा अंतर्गत डांबरीकरण करणे – २ कोटी २५ लाख, हजारे गल्ली धर्मशाळा ते प्रवीण हजारे घर रस्ता – २२.०० लाख,  दिगंबर यादव घर ते सांगोला रस्ता – २२. ०० लाख,चोखामेळा चौक ते मुरलीधर चौक रस्ता १२.०० लाख, पवार घर ते प्रकाश नलवडे घर रस्ता २०.०० लाख अशी एकूण ३ कोटी रुपये एवढ्या भरघोस निधीच्या कामांचा समावेश करण्यात आला आहे.

मंगळवेढा शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने वरील कामांसाठी निधी उपलब्ध होणेसाठी आ आवताडे यांनी संबंधित शासकीय विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरु ठेवला होता. गेली अनेक वर्षे निधीअभावी प्रलंबित असणाऱ्या या रस्त्यांसाठी आ आवताडे यांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर झाल्याने शहरातील महत्वपूर्ण रस्ते आता चकाचक होणार आहेत.

मंगळवेढा शहरातील नेहमीच वर्दळ आणि रहदारीचा असणारा सांगोला नाका ते बोराळे नाका रस्त्याची पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वत्र चिखल व दूषित आणि घाण पाणी यांचे साम्राज्य निर्माण होऊन अतिशय बिकट अवस्था होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असे, तसेच आतापर्यंत या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेकांना अपघातामध्ये आपला प्राण गमवावा लागला होता.

तर काहींच्या कायमस्वरूपी अपंगत्व वाट्याला आले आहे. त्याचबरोबर येथे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे या भागातील जनतेचे आरोग्य सुद्धा धोक्यात आले होते. परंतु आता या रस्त्याची डांबरीकरण रूपाने सुधारणा होणार असल्याने जनतेचे अनेक वर्षांचे या मार्गावरील सुरक्षित प्रवासाचे स्वप्न आ आवताडे यांच्या विकासात्मक दृष्टीमुळे अखेर प्रत्यक्षात दिसणार असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये होत आहे.

यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, भाजपा जिल्हा  सरचिटणीस शशिकांत चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष  चंद्रकांत पडवळे, मंगळवेढा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी व्हा चेअरमन कैलास कोळी,

माजी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी- कोळी, प्रांताधिकारी बी आर माळी, न.पा. प्रशासन अधिकारी विनायक साळुंखे, माजी सैनिक मुरलीधर घुले, न. पा. शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव, दादासाहेब ओमणे, दिलीप आसबे, आझाद दारुवाले, युवक नेते युवराज शिंदे, प्रताप सावंजी, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव, सुशांत हजारे, पप्पू दारुवाले,

संजय माळी, रमेश टाकणे, खंडू खंदारे, अशोक लेंडवे, बाबा कोंडुभैरी, सतिश कोंडुभैरी, प्रशांत गायकवाड, सरपंच सचिन चव्हाण, आनंद मुढे, नवनाथ दिवसे, महेश हजारे, सुधीर हजारे, दिपक उन्हाळे, अक्षय काळुंगे, तानाजी जाधव, आबा हजारे, लतिफ मकानदार, अशोक उन्हाळे, सचिन माने, बाळासाहेब थोरवत, आदी मान्यवर, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शहरातील वाहतुकीसाठी नवसंजीवनी प्राप्त होणार आहे

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्या कर्तृत्ववान नेतृत्वाच्या माध्यमातून रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य व इतर विकासात्मक गोष्टींवर आ आवताडे यांनी अक्षरशः निधीचा रतीब निर्माण केला आहे. या सर्व विकास कामांमध्ये अतिशय गरजेचा आणि महत्वपूर्ण असलेला सांगोला नाका ते बोराळे नाका या रस्त्यासाठी आ आवताडे यांच्या प्रयत्नांमुळे कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने शहरातील वाहतुकीसाठी नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. परंतु आमदार आवताडे यांच्या विकासात्मक दूरदृष्टीमुळे या रस्त्याचे व इतर रस्त्यांचे डांबरीकरण होऊन शहराच्या वैभवामध्ये मोठी भर पडणार आहे –  बाबा कोंडुभैरी, माजी सदस्य, न.पा.शिक्षण मंडळ मंगळवेढा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

September 4, 2026
श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्या निमित्ताने आज मंगळवेढ्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन; झी टॉकीज फेम बाल कीर्तनकारचे होणार कीर्तन

मंगळवेढ्यात आज रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी जन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न होणार; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

September 4, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ उद्या मंगळवेढा तालुका १००% बंद; सकल मराठा समाज आक्रमक, प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन

September 3, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मत मागायला दारी, तर समस्या सोडवायलाही जनतेच्या दारीच! आमदार आवताडे गावपातळीवर करणार थेट मुक्काम; गावकऱ्यांच्या समस्यांचे जागेवरच होणार निरसन

September 2, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
Next Post
शेतकाऱ्यांची सुटका! घर बसल्या आपल्या मोबाईलवरून करा पिक नोंदणी; आता तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही

शेतकऱ्यांनो! पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत द्या माहिती; 'हा' टोल फ्री नंबर जारी; कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 6, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 6, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावध व्हा! रेशन दुकानदाराने फसवले १०० हून अधिक गावकरी; बोटांचे ठसे घेऊन परस्पर काढली कर्जे? कोट्यवधींचा संशयित घोटाळा?

September 6, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उद्धट अधिकाऱ्याला दणका! वीज ग्राहकांशी गैरवर्तन भोवले; पालकमंत्र्यांचे ‘कारणे दाखवा’चे आदेश; भारनियमनाची पूर्वसूचना देणे बंधनकारक

September 6, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा