टीम मंगळवेढा टाईम्स।
सिद्धापूर गावच्या सर्वांगीण विकास कामासाठी जनतेचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी नऊ ते दहा कोटी पर्यंतचा निधी मिळाल्याने सिद्धापूर पंचक्रोशीतील नागरिकातून समाधान व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बापूराव चौगुले यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेला सिद्धापूर वडापूर रस्त्याला डांबरी करण्यासाठी अडीच कोटीचा निधी मिळाला, तसेच पूर्णतः बागात क्षेत्र असलेल्या सिद्धापूर अरळी या गावांला जोडणाऱ्या रस्त्याला देखील पाच कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.
यामुळे वडापूर, कंदलगाव मार्गे सोलापूरला जाण्याचे नागरिकांना सुलभ होणार आहे,शिवाय अरळी सिद्धापूर रस्त्याच्या डांबरीकरणामुळे या भागातील शेतकऱ्यांची मोठी सोय होणार असून या कामाच्या निधीसाठी मार्केट कमिटीचे नूतन संचालक गंगाधर काकणकी तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यानी सततचा पाठपुरावा करून अखेर आमदारांच्या माध्यमातून या दोन्ही रस्त्याला भरीव निधी मिळवील्याचे मत चौगुले यांनी बोलताना सांगितले.
श्री चौगुले पुढे म्हणाले, आमदार समाधान आवताडे यांच्याकडे ज्या कामाची मागणी केली त्या सर्व कामांना त्यांनी तात्काळ निधी देत कामे मंजूर करून दिले आहेत. वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली कामे होत आहेत, आमदारांच्या माध्यमातून सिद्धापूर गावात आमदार फंडातून हनुमान मंदिरा शेजारी खुल्या जागेत सभा मंडप बांधणे 14 लाख,
अंबिका नगर ग्रामपंचायत जागेत एसटी पिकप शेड बांधणे तीन लाख 50 हजार, अंबिकानगर येथे अंबाबाई मंदिरासमोर सभा मंडप बांधणे 7 लाख, तसेच गावांतर्गत मूलभूत सुविधा योजनेतून 25/15 योजनेतून हिंदू स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बांधणे 5 लाख,
गावांतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण यासाठी 10 लाख, गावांतर्गत रस्ते करणे 10 लाख, दलित वस्ती सुधार योजनेतून व्यायाम शाळा बांधकामासाठी 10 लाख,राष्ट्रीय ग्रामीण पेजल योजनेतून जल जीवन मिशन मंजूर काम 31 लाख 70 हजार,
जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सिद्धापूर ते आरळी रस्ता सुधारणा करण्याच्या कामास 8 लाख, सिद्धापूर कुसुर रस्ता होण्यासाठी 10 लाख, सिद्धापूर ते बोराळे रस्ता करण्यासाठी 10 लाख, प्राथमिक शाळा इमारत बांधण्यासाठी व दुरुस्ती करण्यासाठी एक वर्ग बांधकामासाठी 10 लाख,
अल्पसंख्यांक बहुल योजना मधून मुस्लिम दफनभूमीत सुशोभीकरण करण्यासाठी 5 लाख, सिद्धापूर आरळी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 2 कोटी 57 लाख, कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण चार लाख 76 हजार, ठिबक सिंचन एक कोटी 31 लाख, एम एस ई बी विभागामार्फत शेती पंप विज जोडणी ग्राहक सतरा अंतर्गत 5 लाख 10 हजार,
शेती पंप विज जोडणी ग्राहक 24 अंतर्गत 7 लाख 20 हजार वैयक्तिक ट्रान्सफॉर्मर ग्राहक एक अंतर्गत 2 लाख पन्नास हजार, अंबिका नगर येथे तारा काढून केबल टाकणे 4 लाख 25 हजार अशा विविध विकास कामासाठी निधी उपलब्ध झाल्याने अनेक कामे मार्गी लागली आहेत, नक्कीच या विकास कामामुळे सिद्धापूर नगरीला सुंदरतेचे वैभव प्राप्त होणार आहे.
ग्रामदैवत श्री मातृलिंग देवस्थानच्या या पावन नगरीला व तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असल्याने विकास कामाला गती मिळत आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना विकास कामे होण्यासाठी आ आवताडे यांच्याकडून विशेष सहकार्य लाभत असल्याचे मत चौगुले यांनी बोलताना सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज