टीम मंगळवेढा टाईम्स ।
देश सेवा ट्रस्ट व मंगळवेढा तालुका पत्रकार संघाच्या वतीने गरीब व गरजू महिलांना साड्या वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले आहे.
ते देशसेवा ट्रस्ट व मंगळवेढा तालुक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या महिलांना साडी वाटप कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
वव्यासपीठावर माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, मनसे नेते दिलीप धोत्रे, भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते आदित्य हिंदुस्थानी, विवेक खिलारे, संपादक दिगंबर भगरे, मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान फुगारे आदीजन उपस्थित होते.
चौगुले पुढे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा येथील वडार समाजांनी शिकून संघटीत होऊन स्वतःचा विकास केला पाहिजे.
स्वातंत्र्यलढ्यात वडार समाजाचे योगदान मोठे होते. वडार समाजाने सर्वच क्षेत्रात उभे केलेले काम पथदर्शी आहे.
भारतात विश्व निर्माणाचे काम वडार समाजबांधवांनी केले आहे.
देश सेवा ट्रस्ट व मंगळवेढा तालुका पत्रकार संघ यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समाजातील सर्व घटकातील महिलांना साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक खिलारे सूत्रसंचालन वनिता घाडगे तर आभार आदित्य हिंदुस्थानी यांनी मानले.
याप्रसंगी जालिंदर जाधव , सुरेश पवार ,बापू मुदगूल , आण्णा मुदगूल ,विलास जाधव ,नागेश जाधव , अर्जुन मुदगूल हरीभाऊ पवार ,हिरा जाधव , दादा पवार , पशुराम चौगुले , मच्छिंद्र जाधव , शशिकांत जाधव, तात्या जाधव ,
यशवंत मुदगूल ,अनिल शिंदे , सुभाष पवार , दशरथ देवकर , राजेश चौगुले किरण घोडके, सागर जाधव, राहुल जाधव, तम्मा चोगुले, गणेश कुर्हाडे, सतिश मुदगुल, भेया मुदगुल, अमोल मुदगुल, आकाश मंडले, आण्णा जाधव, लहु शिंदे आदींनी परिश्रम घेतले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज