mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा नाही केला तर पवारांची औलाद सांगणार नाही म्हणणारे आता कुठे गेले; राजू शेट्टी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 14, 2021
in राज्य, मंगळवेढा, राजकारण

टीम मंगळवेढा टाईम्स ।

राज्यात सत्ता आल्यावर पाहिले काम शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करतो म्हणणारे व पवारांची औलाद सांगणार नाही असे बोलणारे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांचा सात-बारा का कोरा केला नाही असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे.

ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा येथील आठवडा बाजार येथे आयोजित सभेत बोलत होते.

व्यासपीठावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर, श्रीमंत कोकाटे, उमेदवार सचिन शिंदे, दत्तात्रय गणपाटील,अँड.राहुल घुले, दामाजी कारखान्याचे माजी संचालक श्रीधर खांडेकर,श्रीमंत केदार, संदीप कारंडे,बीड पंचायत समितीच्या सदस्या पूजा मोरे,विठ्ठल कारखान्याचे संचालक बागल,राजाराम सावंत,दयानंद पाटील, संजय बेडे,हर्षद डोरले यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

राजू शेट्टी पुढे बोलताना म्हणाले की, दिगवंत भारत भालके यांना उमेदवारी देण्यासाठी राजाराम सावंत त्यांना घेऊन माझ्याकडे आले होते मी उमेदवारी दिली ते विजयी झाले पण निवडून आलेल्या तिसऱ्याच दिवशी ते दुसऱ्या पक्षात गेले. आजपर्यंत विकास केला म्हणणारे एकानेही विकास केला नाही.

35 गावाला पाणी आणणार म्हणून अजून आणले नाही ते पुन्हा म्हणतात आता नक्की आणणार अरे जनतेची किती दिशाभूल करचाल, पाणी मागून मिळणार नाही ते हिसकावून घेण्याची धमक असणाऱ्याच पाणी मिळणार आहे. त्यासाठी सचिन पाटील निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले.

शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत म्हणून विठ्ठल साखर कारखान्यावर जप्ती आणली तरीदेखील जिल्हाधिकारी जप्ती करत नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दबावापोटी ही कारवाई केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या काळात शेतकरी महिला विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य सरकारने का मदत केली नाही. शेतकऱ्यांच्या जिवालाच्या प्रश्नावर तुम्ही का बोलत नाहीत, एकदा मतदान झाले की लॉकडाउन लागू करणार शेतकऱ्यांची लाईट कट केली जाणार , दुधाचे,डाळींबाचे ,द्राक्षाचे या सरकारने कोणताच निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्री मुंबई मधून बाहेर पडत नाहीत उपमुख्यमंत्री कुणाचे ऐकत नाही अशी गत या सरकारची झाली आहे.

नियमित कर्ज फेडणाऱ्याना सूट देणार होते,सातबारा कोरा केल्याशिवाय गप्प बसणार नाही नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही आता कुठे केले .. काय झाले. या राज्यातील गरीब जनतेसाठी या सरकारने काय केले, ऊस तोडणी मजुरांसाठी काय केले,हमाली करणाऱ्या नागरिकांसाठी काय केले या सरकारने यांचा विचारच केला नाही.

इथले नागरिक बेरोजगार युवक कामासाठी बाहेर गावी जात आहेत यांच्या हाताला काम मिळावे यासाठी तुम्ही काय केले , शेतकऱ्यांच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागा, केळी बागा उध्वस्त झाल्या सरकार मधील मंत्री कुठे गेले फक्त प्रचार करून जात आहेत.

पैसे नाहीत म्हणणारे सरकार स्वतःच्या मंत्र्यांसाठी किती खर्च गाड्या घेतल्या घरे बदलली शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत म्हणता एक चोर साखर कारखानदार शेतकऱ्यांचे पैसे बुडवले आहेत. न्याय भीक मागून मिळत नाही, मागून मिळत नाही तो हिसकावून घ्यावा लागतो. क्रांती घडवण्यासाठी सचिन पाटील यांच्यात धमक असल्याचे त्यांनी सांगितले

उमेदवार सचिन शिंदे बोलताना म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूर मध्ये नव्या परिवर्तनाची लाट आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्ता आल्यानंतर अनेक घोषणा केलेल्या होत्या त्यातील एकही घोषणा यांनी पूर्ण केली नाही.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार होता, पीक कर्ज देणार होते, पीक शेतात असताना लाईट कट करण्याचे पाप यांनी केले आहे. गोरगरिब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. लॉक डाउन काळात शेतकऱ्यांना, महिलांना एका रुपयाची ही मदत केली नाही.

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांचे बिल दिले नाही जनता त्यांना पाडल्या शिवाय राहणार नाही. कामगारांच्या पगारी दिल्या नाहीत, ऊसाची देणी त्या मगच मत मागाला या अशी भूमिका घेतली.

आमदार पुत्र हे वारसा हक्क सांगून आमदारकी मागत आहेत.त्यांनी शेतकरी व गरीब लोकांसाठी काय काम केले शेतकऱ्यांना लुटण्याचे काम यांनी केले आहे. 19 हजार शेतकऱ्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न केला तो आम्ही हाणून पाडला आहे.त्यामुळे त्यांचे सभासदत्व कायम राहणार आहे.

35 गावचे पाणी म्हणजे निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला झाला आहे. आजपर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधीने तेथील जनतेला फसवले आहे. ज्या बारामती करांनी तुमचे पाणी चोरले आहे तेच आज इथे येऊन पाणी देतो म्हणतात ते पाणी काय देणार नाहीत म्हणून नागरिकांनी त्यांना घरी बसवावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले.

रविकांत तुपकर बोलताना म्हणाले की, अन्याय करणाऱ्यांचे मुस्काट फोडा अशी शिकवण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आहे. दिगवंत आमदार भारत भालके यांना राजू शेट्टी यांनी पाहिली उमेदवारी दिली होती. माजलेले साखर सम्राट विरुद्ध शेतकरी अशी ही निवडणूक आहे.त्यामुळे जनतेने योग्य उमेदवार कोण आहे ते ओळखून मत द्यावे.

प्रेमापोटी उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रचाराला आले आहेत अशा भ्रमात राहू नका,ते विठ्ठल साखर कारखाना हडप करण्यासाठी आले आहेत. विठ्ठल साखर कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना बिले दिली नाहीत त्यानी आंदोलने केली म्हणून त्यांना तुरंगात टाकले. शेतकऱ्यांच्या उसाला जास्तीत जास्त दर हा राजू शेट्टी यांच्यामुळे दिला जात आहे.

पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकता येत नाहीत.ही जनता त्यांना योग्य जागा दाखवून देईल , हवा वरून कुणाची ही दिसत असेल पण खरी हवा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आहे. भगीरथ भालके यांनी शेतकऱ्यांची 46 कोटी एफ आर पी आणली पण बिल अदा न करता स्वतःसाठी ठेवले निवडणूक लढवत आहेत.

2009 साली दिगंवत आमदार भारत भालके यांनी सांगितले होते, राजा का बेटा राजा नाही होता, जो काबिल है वही हाकदार बनेगा मग आता ही घराणेशाही कशासाठी असा सवाल त्यांनी केला.

श्रीमंत कोकाटे बोलताना म्हणाले की, सचिन शिंदे हे जनमताचे उमेदवार आहेत.राजू शेट्टी यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी देऊन शेतकरी वर्गाला न्याय देण्याचे भूमिका त्यांनी पार पाडली आहे.

जुलमी किसान कायद्याच्या विरोधात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने करून शेतकऱ्यांना न्याय मिळाला म्हणून रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

लोकशाही ठिकवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.राष्ट्रवादीत बडे नेते भिडे गुरुजी यांचे जवळचे आहेत त्यांनी अनेक हिंदू मुस्लिम दंगली घडवल्या आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपमुख्यमंत्री अजित पवारराजू शेट्टी

संबंधित बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल न्यायालयाने ठेवला कायम; नगराध्यक्षपदाची निवडणूक नियोजित वेळेत की पुढे ढकलणार? सस्पेन्स कायम

November 27, 2025
सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

सौ.अंजुम इरफान सय्यद यांची प्रचारात आघाडी, मंगळवेढा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. 1 मध्ये अंजुम सय्यद यांचा जोरदार प्रचार

November 27, 2025
आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

आप्पा की गॅरंटी! मंगळवेढ्याचा चेहरामोहरा बदलणारा जाहीरनामा भाजपकडून प्रसिद्ध.. वाचा सविस्तर; कोणासाठी काय-काय?

November 27, 2025
Next Post
राजकीय धुळवड! भाजप-राष्ट्रवादीचे बडे नेते आज पंढरपुरात समाधान आवताडे,भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

राष्ट्रवादीची जागा धोक्यात! एका समाधान आवताडेंना पराभूत करण्यासाठी निम्मं मंत्रिमंडळ मतदारसंघात

ताज्या बातम्या

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

आधी जनतेची कामे केली आता जनता समाधान हेंबाडे यांना नगरपालिकेत पाठवणार; प्रभाग 2 मधून समाधान हेंबाडे यांना उस्फुर्त प्रतिसाद

November 28, 2025
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

मोठी बातमी! राज्यातील सर्व शाळा ‘या’ तारखेला बंद राहण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

November 28, 2025
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

नागरिकांनो! मी आत एक आणि बाहेर एक भूमिका घेणारा माणूस नाही; आमदार समाधान आवताडेंनी स्पष्टच सांगितले…, चांगली माणसे निवडून द्या; अफवांवर विश्वास ठेवू नका

November 28, 2025
आमदार व्हायचंय? भरा अर्ज, आजपासून प्रक्रिया, विधानसभेसाठी १० हजार रुपये डिपॉझिट; उमेदवारी अर्ज दाखल करताना ‘या’ गोष्टींवर बंदी

निवडणूक कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत नगराध्यक्ष निवडणूक स्थगित राहण्याची दाट शक्यता; नगरसेवकपदांच्या निवडणुका मात्र पूर्ववत; आज चित्र स्पष्ट होणार

November 28, 2025
शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

शिट्टी वाजली! पत्रकारितेतून समाजकारण आणि राजकारणाकडे वाटचाल; पत्रकार महादेव धोत्रे प्रभाग 8 मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात, मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

November 28, 2025
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

November 28, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..