मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची तर त्यांच्यासोबतच आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.
दरम्यान, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह १० जणांवर प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांनी जिल्ह्यांची जबाबदारी सोपविली आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर पुणे, सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादीचे हे व्हिजन आहे.
२०१४-२०१९ दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी बाकावर असताना सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे प्रभारी म्हणून अजित पवार यांनी जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अजित पवार यांनी सोलापूरची जबाबदारी स्वीकारली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे व यशवंत माने, राष्ट्रवादीचे पुरस्कृत आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील,
माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, माळशिरसचे नेते उत्तम जानकर यांच्यासह बहुतांश नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व मान्य केले आहे. अजित पवारांना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे सोलापुरातील नेते संतोष पवार व जुबेर बागवान म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. सोलापूर शहर जिल्हाच्या वतीने आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो.
अजित पवार यांच्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीला निश्चितच बळ मिळेल, सोलापूर शहरातील विकास कामालाही गती मिळेल. जिल्ह्याच्या राष्ट्रवादीत बदल होतील हे निश्चित मानले जात आहे. (स्रोत;सकाळ)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज