महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गेले काही दिवसापासून थकवा जाणवू लागल्याने त्यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मात्र अजून काही दिवस ते घरीच विश्रांती घेणार आहेत.
अजित पवार यांना थकवा जाणवू लागला होता. ते घरीच होते. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे.
आज राष्ट्रवादी पक्षाच्या प्रदेश कार्यालयात होणाऱ्या भेटी गाठी साठी ते उपस्थित राहू शकणार नाहीत.
अजित पवारांना कणकण आणि थोडासा ताप असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. त्यांच्या कोरोना टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने ते घरीच आराम करत आहेत.
परतीच्या पावसाने राज्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. याची पाहणी करण्यासाठी अजित पवार सोलापूर, पुणे, इंदापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांना थोडा थकवा जाणवत होता.
अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती. अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची टेस्ट केली. मात्र, त्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला. सध्या अजित पवार हे घरीच असून ते विश्रांती घेत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज