मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
रिझर्व्ह बँकेने सोलापूर समर्थ सहकारी बँकेवर घातलेल्या निर्बंधांनंतर ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि घबराट निर्माण झाली आहे.
या निर्णयाची बातमी समजताच मंगळवेढा आणि दामाजी कारखाना शाखेत बुधवारी सकाळपासून ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तर, बँक खातेदाराचे बँकेत दिवसभर फोन खणखणत होते.
अचानक आलेल्या निर्बंधांमुळे अनेकांनी आपल्या ठेव रकमेबाबत प्रश्न उपस्थित केले असून, शाखा व्यवस्थापकांना ठेवीदारांची समजूत काढताना अक्षरशः नाकीनऊ आले आहे.
मंगळवेढा व दामाजी कारखाना शाखांमध्ये मिळून सुमारे ५० कोटी रुपयांच्या ठेवी असून, बँकेचे व्यवहार तात्पुरते मर्यादित करण्यात आले आहेत.
शेकडो खातेदारांनी ठेवी काढण्यासाठी अर्ज दाखल केले असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठेवीदारांनी घाबरून जाण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध हे तात्पुरते आहेत. बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, सर्व ठेवी सुरक्षित आहेत, “असे मंगळवेढा शाखेचे प्रभारी व्यवस्थापक संदीप कुलकर्णी यांनी बोलताना स्पष्ट केले.(स्रोत:लोकमत)
विविध उपक्रमांनी वन्यजीव सप्ताह साजरा
सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने शहरात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला. वृक्षदिंडी, सायकल रॅली, विविध स्पर्धा आदी माध्यमातून पर्यावरण व वन्यजीवांविषयी जनजागृती करण्यात आली. यात विविध सामाजिक संस्था व शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला.
१ ते ७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने युगंधर फाउंडेशन, सामाजिक वनीकरण, एनटीपीसी तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव सप्ताहाचे
आयोजन करण्यात आले होते. सप्ताहाचे उद्घाटन १ ऑक्टोबर रोजी वृक्षदिंडी आणि सायकल रॅलीने करण्यात आले. या उपक्रमात जवळपास पाचशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.
गांधी जयंतीनिमित्त स्मृतिउद्यान परिसर स्वच्छता आणि परिसर स्वच्छता करण्यात आली होती. ३ तारखेला निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा, घरटे बनविणे, घोषवाक्य स्पर्धा तसेच शिल्पकला स्पर्धा सोलापूर जिल्ह्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले होते.
४ ऑक्टोबर रोजी संगमेश्वर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वन्यजीव विषयी प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली. यामध्ये एकूण सात शाळा तर पाच महाविद्यालयातील गट सहभागी झाले होते.
शालेय गटामध्ये सिद्धेश्वर प्रशाला तर महाविद्यालयीन गटामध्ये संगमेश्वर कॉलेज प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केली. ५ ऑक्टोबर रोजी वनविभागातील कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
ऑक्टोबर रोजी पर्यावरण जाणीव जागृती एकदिवसीय परिसंवाद पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ भूशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज