मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
औषधनिर्माणशास्त्र पदवी बी.फार्म आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. सीईटी सेलने मंगळवारी रात्री संकेतस्थळावर वेळापत्रक प्रसिद्ध केले असून, विद्यार्थ्यांना येत्या २० जुलैपर्यंत ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे.
सीईटी सेलने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि कागदपत्रे अपलोड करण्यासाठी २० जुलैपर्यंत मुदत दिली आहे. त्यानंतर २१ पडताळणी करून घ्यावी लागेल.
दि. २० जुलैपर्यंत नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅप फेरीमध्ये सहभागी होता येणार नाही. तात्पुरती गुणवत्ता यादी २३ जुलै, तर अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना दि. ३ ते ५ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेशनिश्चिती करावी लागणार आहे. सीईटी सेल कडून एकूण तीन फेऱ्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणीवेळी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. अथवा प्रमाणपत्र काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे
अन्यथा या विद्यार्थ्यांना खुल्या गटातून प्रवेश दिले जातील, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी माहितीसाठी
https://ph2023.mahacet.org/ StaticPages/frmImportantDates या संकेतस्थळाला भेट द्यावी.
दरम्यान, मंगळवेढा शहरात इंग्लिश स्कूल येथे डी व बी फार्मसी ऍडमिशन प्रक्रिया सुरू आहे. अधिक माहितीसाठी कॉलेजला भेट देऊन माहिती घेऊ शकता.
फार्मसी प्रवेश सविस्तर वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रे अपलोड करणे २० जुलै, कागदपत्रांची पडताळणी २१ जुलै, तात्पुरती गुणवत्ता जुलैपर्यंत कागदपत्रांची यादी २३ जुलै,
हरकती नोंदविणे २४ ते २६ जुलै, अंतिम गुणवत्ता यादी २८ जुलै, पसंतीक्रम नोंदविणे २९ ते ३१ जुलै, तात्पुरती निवड यादी २ ऑगस्ट, महाविद्यालय निवडणे आणि प्रवेश घेणे ३ ते ५ ऑगस्ट,
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज