टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून आमदार प्रशांत परिचारक किंवा दामाजी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे या दोघांपैकीच एकाला उमेदवारी देण्याची चर्चा मुंबईतील बैठकीत झाली आहे.
दरम्यान , आवताडे यांनाच फायनल तिकीट दिले तर यावर आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटातील कार्यकत्यांची काय भूमिका राहील याकडेही भाजप नेते लक्ष आमदार ठेवणार आहेत. त्यानंतरच उमेदवारी जिल्हाध्यक्ष जाहीर केली जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाने आवताडे व परिचारकांचे मनोमिलन केल्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव अटळ असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे. आवताडे व परिचारक पंढरपूरच्या उमेदवारीवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत परिचारक पाटील यांच्या उपस्थितीत भाजप नेत्यांची बैठक झाली.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, माजी मंत्री सुभाष देशमुख,आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, उमेश परिचारक यांच्यासह इतर नेतेही उपस्थित होते.
भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी आमदार प्रशांत परिचारक, अभिजित पाटील, बी.पी.रोंगे, उमेश परिचारक, समाधान आवताडे इच्छुक आहेत. या बैठकीत माजी मंत्री राम शिंदे यांच्या नावाचीही चर्चा झाली.
आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुबीयांबद्दल सहानुभूती आहे. राष्ट्रवादी भालके कुटुंबातील उमेदवार देणार आहे. त्यात मतदारसंघाबाहेरचा उमेदवार दिल्यास अडचण होईल असा विचारही काही लोकांनी बोलून दाखविला.
परिचारक आणि आवताडे या दोघांच्या उमेदवारीवर बराच वेळ चर्चा झाली. सचिन वाझे प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादीविरोधात रान तापविले आहे.आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिल्यास भाजपला अडचणीत आणण्याचा सत्ताधारी मंडळींकडून होईल काय याचाही अंदाज यावेळी घेण्यात आला.
आवताडे यांनी यापूर्वी दोनदा निवडणूक लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीवर फायनल विचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु या निर्णयावर परिचारक गटाची भूमिका काय असेल याचीही चाचपणी भाजप नेते करीत आहेत.
तिकीट कुणालाही मिळो आमदार प्रशांत परिचारक यांनी या निवडणुकीची धुरा सांभाळायची.आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनीही त्यांना पूर्णपणे सहकार्य करावे , असे स्पष्टपणे भाजप नेत्यांनी सांगितले आहे.
... तर अंजली आवताडे यांना उमेदवारी!
राष्ट्रवादीकडून दिवगंत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी दिल्यास भाजपकडून समाधान आवताडे यांच्या पली अंजली आवताडे यांना उमेदवारी दिल्यास काय होईल याचीही चाचपणी केली जात आहे. मात्र या शक्यतेवर सकाळी पुन्हा चर्चा होणार आहे.
मतविभागणी वरच करणार मातब्बरांचे भवितव्य
पांडुरंग परिवाराची हक्काची 80 ते 90 हजार मते आहेत, त्या पुढे त्यांची मजल जात नाही. समाधान आवताडे यांची 50 हजार,परंतु राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या तीन निवडणुकात सलग मतांची टक्केवारी घटतीच आहे.
यंदा राष्ट्रवादीतील फूट, स्वाभिमानी शेतकरी , शैला गोडसे यांची संभवित उमेदवारी आणि वंचित बहुजन यांच्या मुळे होणारी मतं विभागणी ही भगीरथ भालके यांची डोकेदुखी वाढविणारी आहे.
कारण सचिन पाटील हे विठ्ठलाच्या नाराज सभासदांची मते तर शैला गोडसे (या दोघांची उमेदवारी शेवटपर्यंत टिकली तर) हे भालके यांची मंगळवेढ्यातील मते खेचू शकतात.
जो दलित आणि मुस्लिम मतदार कै.भारत नानांचा खरा आधार होता , ती वोट बँक वंचित बहुजन कडे वळू शकते. शक्य तितकी मतविभागणी टाळण्याचे आव्हान भगीरथ भालके यांच्या समोर आहे तर केवळ गट एकसंघ बांधून ठेवण्याचे आव्हान परिचारकांच्या समोर आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज