मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील करकंब ग्रामपंचायतीच्या मासिक मीटिंगमध्ये करकंब बसस्थानक व इतर ठिकाणी डिजिटल व बॅनर तसेच डीजे लावण्याबाबत बंदी घालण्याचा मासिक सभेत ठराव घेतल्याने आबालवृद, नागरिक विशेषतः महिलांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून करकंबच्या प्रवेशद्वारावर अर्थातचं एस.टी. बसस्थानक ठिकाणीच डिजिटल फलकांचा सुळसुळाट झाला होता.
त्याच अनुषंगाने करकंब ग्रामपंचायतने दि. २२ फेब्रुवारीला सरपंच तेजमाला अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात मासिक सभा घेण्यात आली.
यावेळी मासिक सभेत गावात बॅनर बंदी, डीजेला बंदी करणे, विषय चर्चेत आला असता या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
गावात कोणीही कुठेही ग्रामपंचायतची परवानगी न घेता बॅनर लावत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे व डीजेचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होत आहे.
गावात मुख्य बाजारपेठ असून व दवाखान्यांची संख्याही जास्त आहे. काही प्रमाणात जुन्या मातीची कच्ची घरेही आहेत. त्यामुळे डीजेच्या आवाजाने त्या घरांना धोका होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याबाबत ग्रामपंचायतची परवानगी घेतली जात नाही. त्यामुळे गावात बॅनर बंदी व डीजेला बंदी करण्यात यावी. असे सभेत सर्वानुमते ठरले तसा ठराव करण्यात आला.
ठरावाची नक्कल सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांच्याकडे दिली. यावेळी आर. आर. जाधव, अॅड. शरदचंद्र पांढरे, उपसरपंच आदिनाथ देशमुख, विवेक शिंगटे उपस्थित होते.
मासिक सभेत सर्वानुमते बॅनर बंदी आणि डीजे व डॉल्चीबंदीसाठी ठराव घेण्यात आला आहे. बॅनर बंदी आणि डीजेबाबत कडक अंमलबजावणी करणार आहे.-तेजमाला पांढरे, सरपंच..
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज