टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगढवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने समाधान आवताडे यांच्याच नावावर अखेरची पसंती दर्शविली आहे. दरम्यान पंढरपूरच्या बैठकीत परिचारक गटाने उमेदवारी कोणीही असो… वरिष्ठांचा निर्णय मान्य करू अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये उमेदवारीबाबत चर्चेचे गुहाळ चालू होते. राम शिंदे,अभिजित पाटील अन् डॉ.बी.पी. रोंगे यांची नावे मागे पडून शेवटच्या टप्प्यात प्रशांत परिचारक अन् समाधान आवताडे यांच्याच नावाभोवती चर्चा केंद्रीत झाली.
अखेर आवताडे यांच्याच नावाला अंतिम मान्यता देण्यात आली असली तरी आज किंवा धुळवडीनंतर म्हणजे दि.२९ मार्च नंतर जाहीर घोषणा होणार आहे. ३० मार्च रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.
आतालक्ष महाआघाडीच्या उमेदवारी घोषणेकडे लागले आहे. दरम्यान,परिचारक कुटुंबातील असो अथवा समाधान आवताडे असो यंदा मतविभागणी झाली नाही पाहिजे. वरिष्ठांचा आदेश मानू असे मत आ.प्रशांत परिचारकांनी कार्यकर्त्यांना गुरुवारच्या बैठकीत व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक आ.प्रशांत परिचारक व व युटोपियन साखर कारखान्याचे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी पंढरपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घेतली.
यावेळी पांडुरंग सभापती दिलीप घाडगे, उपाध्यक्ष विवेक कचरे, भाजपा तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे, बाळासाहेब देशमुख, प्रशांत देशमुख, प्रणव परिचारक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
मी व उमेश परिचारक यांनी भाजपाकडे पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली आहे. त्यांच्याकडून समाधान आवताडे किंवा परिचारक कुटुंबातील एकाला उमेदवारी मिळेल असा वरिष्ठ स्तरावरुन निरोप मिळाला असो आहे. परंतु उमेदवारी दोघांपैकी. कोणालीही मिळो आपण सर्वांनी एकदिलाने काम करायचे आहे असे प्रशांत परिचारकांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज