टीम मंगळवेढा टाईम्स।
शेतात शेळ्या राखत असताना ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना घडली.
ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्य पदाचे उमेदवार किसन सोपान यादव (६५, रा. चिकमहुद, तळेवाडी ता.सांगोला ) यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला.
यामुळे येथील एका जागेची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास चिकमहुद (तळेवाडी), ता. सांगोला येथे घडली.
यादव हे चिकमहुद ग्रामपंचायत निवडणुकीतील सदस्यपदासाठी प्रभाग क्रमांक ५ मधील अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या सदस्य पदासाठी उभे होते.
त्यांचा मृत्यू झाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित केल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
चिकमहुद (ता. सांगोला) ग्रामपंचायत निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता.
दरम्यान, तमजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक- ५ चे अनुसूचित जाती या प्रवर्गातील सदस्य पदाचे उमेदवार किसन सोपान यादव हे शुक्रवारी स्वतःच्या शेतात शेळ्या राखत होते.
दुपारी दीडच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये ते जागेवर कोसळले. त्यावेळी शेजारील शेतात मका तोडणाऱ्या महिलांनी ही घटना पाहून त्यांच्या नातेवाइकांना कळवले.
नातेवाइकांनी त्यांना तातडीने उपचाराकरिता महूद येथील दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून ते उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, किसन यादव यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी दोन्हीही आघाडीचे उमेदवार राजकीय पक्षाचे नेते उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज