टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-सोलापूर महामार्गाचे काम करणारे डी.बी.एल.कंपनीच्या चालकाने जे.सी.बी. निष्काळजीपणे चालवून सिमेंंटचा चौकोनी ब्लॉक मोटर सायकलस्वाराच्या अंगावर पडून त्यात एक मयत तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी जे. सी. बी. चालक आशिष राजेंद्र प्रसाद पटेल याच्याविरूध्दगुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या अपघातामध्ये पंडित श्रीधर शिंदे (वय35,रा.मेटकरवाडी) हा मयत झाला आहे.
या घटनेची हकिकत अशी,यातील जखमी फिर्यादी चंद्रकांत शिंदे व मयत भाऊ पंडित शिंदे हे दोघे दि.8 रोजी सकाळी 10.30 च्यादरम्यान एम एच 13,डी.5258 यामोटर सायकलवरून मंगळवेढा येथील सांगोला नाका मार्गे सोलापूरकडे जाणार्या सर्व्हिस रोडने जात असताना
यातील आरोपी आशिष पटेल याने आपल्या ताब्यातील जे.सी.ब.ी क्र.एम पी.39 एच 1616 हा निष्काळजीपणे रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून जे.सी.बी.च्या फळीमधून सिमेंट ब्लॉकला धक्का लागल्याने तो ब्रीज खालून जाणार्या मोटर सायकल स्वाराच्या अंगावर पडल्याने त्यामध्ये पंडित शिंदे यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला.
व फिर्यादीला गंभीर जखमी करून मोटर सायकलचे दोन हजाराचे नुकसान केल्याचे दिलेल्या फि र्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदर शरणकुमार लिंबाळे हे करीत आहेत.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज