टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजी साखर कारखान्याच्या एकाही शेतकरी सभासदावर अन्याय अथवा त्यांचे सभासदत्व रद्द होणार नाही याची मी ग्वाही देतो. त्यांच्या अधिकारावर गदा येणार नसल्याची माहिती भाजप उमेदवार समाधान आवताडे यांनी दिली.
प्रचारादरम्यान विरोधकांकडून दामाजी कारखान्याच्या १९ हजार सभासदांचे सभासदत्व रद्द करून स्वतःचा खाजगी कारखाना करण्याचा समाधान आवताडे यांच्यावर प्रचारात आरोप होत आहे, या आरोपाला समाधान आवताडे यांनी उत्तर दिले.
मंगळवेढा पंढरपूर विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील कचरेवाडी, गणेशवाडी, शेलेवाडी, डोंगरगाव, अकोला, गुंजेगाव, महमदाबाद या भागात प्रचारसभा झाल्या.
समाधान आवताडे पुढे बोलताना म्हणाले की, ९७ वी घटना मागच्या संचालक मंडळाने मान्य केली , त्यात नमूद होतं , क्रियाशील व अक्रियाशील कसे ठरवायचे हा कायदा अंमलात आणला नसता तर संचालक मंडळ बरखास्त होऊ शकलं असतं प्रशासक आला असता परंतू ९७ व्या घटना दुरुस्तीचा भाग म्हणून अक्रियाशील सभासदांना नोटिसा दिल्या आहेत.
शासनाने आम्हाला कळविल्याने नोटीस देणे भाग होते परंतु निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर संचालक मंडळाची बैठक घेऊन ठराव मंजूर करायचा नंतर विशेष सर्वसाधारण सभा घेऊन तो ठराव पारित करून निर्णय मागे घेण्यासाठी शासनाला तो ठराव पाठविण्यात येणार आहे.
आणि शासनाला अधिकार आहे तो मान्य होईल , ही प्रकिया आहे. तुम्ही कुणीही अक्रियाशील सभासद होत नाही तुमची साखर चालू आहे, तुम्ही कारखान्याचा मोबदला घेत आहेत.
या प्रचारदौऱ्यानिमित्त भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे , महाराष्ट्र राज्य माजी मंत्री रयत क्रांतीचे पक्षप्रमुख सदाभाऊ खोत, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष विनायक जाधव , माळशिरस तालुक्याचे आमदार राम सातपुते, भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,भाजप माजी जिल्हाध्यक्ष शहाजीबापू पवार , रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष राहुल बिडवे,
भाजप जिल्हा उपाध्यक्ष औदुंबर वाडदेकर , भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण , दामाजी कारखाना संचालक सुरेश भाकरे दामाजी कारखाना संचालक सचिन शिवशरण , दुध संघाचे संचालक शिवाजीराव नागणे , युनूस शेख , नंदकुमार हावनाळे , लक्ष्मण मस्के , प्रा.येताळा भगत सर , प्रा.दत्तात्रय जमदाडे , भटक्या विमुक्त समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष मच्छिन्द्र भोसले , सरपंच , चेअरमन , प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज