टीम मंगळवेढा टाईम्स।
दामाजी कारखान्याने गत गळीत हंगामात ऊस उत्पादकांना वेळेत २८०० रुपये हा एफआरपीपेक्षा जादा दर दिला असून, कामगारांचे पगार, तोडणी-वाहतूक ठेकेदारांची देणी, पीएफ व इतर कपाती नियमितपणे अदा करण्यात आल्याचे चेअरमन शिवानंद पाटील यानी सांगितले.

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची ३७ वी वार्षिक सभा कारखाना कार्यस्थळावर रविवारी पार पडली. यावेळी धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी संचालक मंडळाच्या कामकाजाचे कौतुक केले.

तर, माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार यांनी सहप्रकल्प उभारणीवर भर द्यावा, अशी सूचना केली.

व्यासपीठावर राहुल शहा, रामचंद्र वाकडे, दामोदर देशमुख, व्हाइस चेअरमन तानाजीभाऊ खरात, संचालक मुरलीधर दत्तू,

गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार,

दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, अजित जगताप, चंद्रशेखर कोंडुभैरी, लतिफ तांबोळी, मारुती वाकडे, महादेव फराटे, भारत पाटील, तसेच शिवाजीराव नागणे, कल्याण रोकडे, शिवाजीराव पवार, रामेश्वर मासाळ, प्रवीण खवतोडे, किसन सावंजी, सुनील डोके, राजकुमार बिराजदार आदी उपस्थित होते.

सूत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले, तर आभार संचालक रेवणसिद्ध लिगाडे यांनी मानले.
५.५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट
येणाऱ्या गळीत हंगामात सर्व यंत्रणा सज्ज केली असून, या गळीत हंगामात साडेपाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. येणाऱ्या उसाला इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यास कटिबद्ध आहे.

३० वर्षांच्या समाजकारण व राजकारणाचे कालावधीत सर्व सहकाऱ्यांना समजून घेऊन योग्य निर्णय घेत असल्याने मला चेअरमन पदाची संधी दिली आहे.
सर्वांना समान वागणूक देत असताना कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेत सर्व घटकांना सामावून घेऊन काम केले आहे. दुजाभाव केला नाही व करणारही नाही, असे सुतोवाच चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










