मंगळवेढा टाईम्स न्यूज।
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी नगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकीत देखील आखाड्यातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला. दोन दिवस तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.
तीन वर्षांपूर्वी झालेल्या श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील सर्व गटातील संचालक मोठ्या फरकाने विजयी झाले.

तीन वर्षे कारखान्याचा कामकाज करताना कामगाराचा थकीत पगार ,भविष्य निर्वाह निधीची रक्कम व इतर थकीत देणी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

या गटात लिंगायत ,धनगर,मराठा व इतर समाजाचे सर्वाधिक मतदार आहेत.ऊस उत्पादक पट्टा असल्यामुळे सहाजिकच दामाजी कारखान्याबद्दल या परिसरात मोठी विश्वासार्हता ती अध्यक्ष शिवानंद पाटील व उपाध्यक्ष तानाजी खरात यांनी टिकवून ठेवल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली या गटावर वर्चस्व प्रस्थापित करणे सहज शक्य होणार होते.

अशा परिस्थितीत तीन महिन्यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरक्षण सोडतीत दामाजी नगर गट ओबीसीसाठी आरक्षण झाला त्याचबरोबर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण देखील ओबीसीसाठी आरक्षित झाले.

मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप विरोधात तिर्थक्षेत्र आघाडी अशी लढत झाली त्यामुळे त्याच पद्धतीने जिल्हा परिषद निवडणूक होणार असल्याची शक्यता होती. दामाजीचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या माघारीनंतर या गटातून जिल्हा परिषदेसाठी कोण नवीन चेहरा समोर येणार हे याची उत्सुकता मात्र शिगेला लागली.

मात्र नगरपालिकेच्या निकालानंतर तालुक्यात मत विभागणी टाळण्यासाठी आ.अवताडे व परिचारक गटात समझोता करत दामाजी नगर जिल्हा परिषद गट व तीन पंचायत समिती गण परिचारक समर्थकांसाठी तडजोडीत देण्यात आल्याचे वृत्त धडकले त्यामुळे त्या जागेसाठी शिवानंद पाटील यांच्या नावाची चर्चा जोरात जोर धरू लागली.

मात्र त्यांनी निवडणुकीपेक्षा दामाजीकडे इतर कोणताही उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील उपलब्ध उसाचे गाळप वेळेत करणे, कर्मचाऱ्यांचे, वाहनधारकांची देणी वेळेत अदा करणे ही जबाबदारी महत्त्वाची असल्याने या दृष्टीकोनातून निवडणुकीतून बाजूला राहण्याचा निर्णय घेतला.
कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी
दामाजीनगर जिल्हा परिषद गटासाठी माझ्या नावावर दाखवलेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी मी कधीही विसरणार नाही. कार्यकर्त्यांच्या घामाला संधी मिळावी म्हणून मी स्वेच्छेने एक पाऊल मागे घेत आहे; मात्र तुमचा जिव्हाळा, प्रेम, विश्वास कायम राहील, यावर माझा ठाम विश्वास आहे. अफवा उठल्या, नाव चर्चेत आले; पण विश्वास अबाधित राहील.-शिवानंद पाटील,अध्यक्ष श्री. संत दामाजी साखर कारखाना.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज










