टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुकताच सोलापूर विद्यापीठाचा 18 वा युवा महोत्सव मंगळवेढ्यातील दलित मित्र कदम गुरुजी सायन्स महाविद्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
कोरोना या महामारीमुळे गेले दोन वर्षे विद्यार्थ्यांना आपल्या कला सादर करता आल्या नाहीत. झालेल्या युवा महोत्सवात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.
दलित मित्र कदम गुरूजी महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या युवा महोत्सवाबद्दल इंग्लिश स्कूल येथील एका शिक्षकाने आपल्या भावना कवितेतून व्यक्त केल्या आहेत.
दलित मित्र कदम गुरूजी महाविद्यालयाच्या प्रांगणात थिरकली तरुणाई…
होऊनी बेधुंद नव्या जोशात ……. युवा महोत्सवात. बहुजनास दिली संधी , या कला सोहळ्यात, भेटले पुन्हा आम्हास ‘गुरुजी’, ‘बापू’ तुमच्या रूपात.
दुमदुमला दलित मित्र कदम गुरूजी रंगमंच एकांकीका…. नाटयछटेने होऊनी …… स्त्री भ्रूण हत्या, होऊनी….महागाई, होऊनी …… हलगी सम्राट,
होऊनी …… राधा, होऊनी ……. मोबाईलचा दुष्परीणाम तर होऊनी समस्या …… तुमच्या आमच्या.
फुलले कुठे …… स्वररंगाचे इंद्रधनु
तर भेटला …… मातीच्या आकारात शिल्पकार, कुठे उतरले ……. चित्र कॅनव्हास वरती, कुठे दिसला जुगाड ….. टाकाऊ पासुन टिकाऊचा.
कुठे समजले भाष्य….. मुकनाट्यातुन, कधी झालो मग्न …. कथाकथनात, कुठे बोलल्या भिंती ……. भित्तीचित्रातून,
कुठे उधळले रंग जाणिवेचे …… रांगोळीत, कोणी मांडल्या व्यथा ….. व्यंगचित्रातून,
बाहेर पावसाच्या सरींचा, आत प्रश्नोत्तरांचा लपंडाव आम्ही पाहीला. उन सावली प्रमाणे, वाद विवादही ऐकला.
जोपासली संस्कृती , जोपासली कला मंत्रमुग्ध झाले रसिक, पाहुणी लोनृत्याचा अविष्कार,
दमलेल्या मनाला, भुकेल्या पोटाला रुचकर भोजनाचा आस्वदही भेटला. विसावला देह पुन्हा, गुरुजींच्या अंगणी मिटेनात डोळे, पाहता आदर आयोजकांचा…….. पाहुण्यांसाठी.
समारोप लागे अमृतापरी होऊनी सैराट…… गौरविले गुणवंत, संपला जरी सोहळा, निघेना पाय आता, जणू लळा लागला इथला. निघेना पाय आता , जणू लळा लागला इथला ..
श्री.विशाल माने. सहशिक्षक इंग्लिश स्कूल , मंगळवेढा .
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज