मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सायबर सुरक्षा व सायबर गुन्ह्यांबद्दल कायद्याचे ज्ञान, डिजिटल अरेस्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित सायबर गुन्हे कसे होतात, याची माहिती सांगताना कार्यशाळेत अधिकाऱ्याचाच मोबाइल ‘हॅक’ करून दक्षता कशी घेतली पाहिजे,
याचे मार्गदर्शन वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर क्राइम श्रीशैल गजा व सायबरतज्ज्ञ अविनाश पाटील यांनी केले. यूझर नेम व पासवर्डबाबत सतर्क राहिले पाहिजे, असेही कार्यशाळेत सांगण्यात आले.
व्हॉट्सअॅप हॅकिंग फसवणूक, नोकरी व बक्षिसाचे आमिष, गुंतवणुकीतून फायद्याचे आमिष, क्रिप्टो करन्सी घोटाळे, सोशल मीडिया आणि डेटिंग अॅप्सवरील फसवणूक याबाबतची माहिती सायबरतज्ज्ञ अविनाश पाटील यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील सुमारे २२४ पतसंस्थांचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत अनेक तज्ज्ञांनी सायबर क्राइम व इतर प्रकारे फसवणूक टाळण्याबाबत मार्गदर्शन केले.
एमसीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे, एमसीडीसीचे राज्य समन्वयक धनंजय डोईफोडे, डीडीआर किरण गायकवाड, एमसीडीसीच्या महाव्यवस्थापक शिल्पा कडू- भदाणे यांनी प्रश्नांची उत्तरे दिली.
अँटी-मनी लॉन्ड्रिंग तरतुदीबाबत…
अँटी-मनी लॉन्ड्रिंग तरतुदीबाबत पतसंस्थांनी कोणती दक्षता घेतली पाहिजे, छोट्या रकमांचे व्यवहार, नियमित अंतर्गत लेखापरीक्षण, दहशतवादी निधी प्रतिबंध याबाबत सायबर क्राइम शहरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी माहिती दिली.
ठेवी, निधी संकलन व व्यवहार यावर मंगेश देहेडकर, लेखापरीक्षक संतोष मनुका यांनी पतसंस्थांसाठीचे सुधारित आर्थिक मापदंड, जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी कर्ज वसुलीसाठीचे कायदे याची माहिती दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज