टीम मंगळवेढा टाईम्स ।
सण उत्सव निमित्त होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खरबदारी घेत सोलापूरचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सोलापूर शहरात 30 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरण्यास बंदी त्यानुसार पाच अथवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्रित फिरता येणार नाही.
आदेश मोडणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. असेही पोलीस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले गेले आहे.
राज्यातील सोलापूर हे शहर धार्मिक उत्सव, सण, जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणावर येथे साजरी केले जाते. शहरात छोट्या-मोठ्या कोणत्याही कारणावरून सभा, संप, आंदोलने, निदर्शने केली जातात.
गर्दी टाळण्याच्या उद्देशाने निर्णय; दरम्यान, येत्या रविवारी शहरात गणपती विसर्जनाच्या निमित्ताने मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे त्यातून कायदा व सुव्यवस्था राखून ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय जमावबंदीचा घेतलेला आहे.
आता सोलापूरकर या निर्णयाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज