टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोना रूग्णांची वाढती संख्या पाहता सोलापूर शहर व जिल्ह्यात आज २४ फेब्रुवारीपासून रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
ही संचारबंदी ७ मार्चपर्यंत असणार आहे. याशिवाय ७ मार्चपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
आजपासून ‘हे’ असणार कडक नियम
आजपासून सोलापुरात 7 मार्चपर्यंत कडक रात्र संचारबंदी,आज मध्यरात्रीपासून रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत संचारबंदी.
कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शहर आणि जिल्ह्यातील टेस्टींग वाढविणार, शाळा-महाविद्यालय 7 मार्चपर्यंत बंद राहणार,10 वी आणि 12 चे वर्ग सुरु राहणार.
क्रिडांगणावर 7 मार्चपर्यंत कोणत्याही क्रिडा स्पर्धा भरवण्यास बंदी,लग्नसमारंभासाठी 50 लोकांची मर्यादा,कोव्हिड केअर सेंटर, डेडिकेटेड कोव्हिड सेंटर वाढविणार.
कर्नाटकातून सोलापूर शहर आणि जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य असल्याचे आदेश दिले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज