टीम मंगळवेढा टाईम्स ।
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येथील धान्य गोदामात आयोजित केलेल्या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या २३ अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. निवासी नायब तहसीदार बालाजी पुदलवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दाखल केली आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये येथील तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शासकीय धान्य गोदामात निवडणूक विषयक प्रशिक्षण आयोजित केले होते.
यासाठी नेमलेल्या विविध विभागांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हजर राहणे क्रमप्राप्त असताना २३ जण गैरहजर राहिले होते. त्यांना कारणे दाखवा नोटीसा बजावूनही खुलासा सादर केला नाही.
त्यामुळे निवडणूक कामात अडथळा केल्याचा ठपका ठेऊन त्यांच्या विरूद्ध नायब तहसीलदार पुदलवाड यांनी फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करीत आहेत.
गुन्हा दाखल झालेले कर्मचारी याप्रमाणे :
मंगेश एस. शिंदे (वरिष्ठ सहाय्यक बी अॅन्ड सी), नागनाथ महाराज सोरेगांवकर (शिक्षक), उस्मान गुलाब तांबाकळी (क. लिपीक, सोलापूर मनपा), रामेश्वर पंडित सोलापुरे (सहा. शिक्षक), शहाबाज़ अमीनोद्दीन काझी (कला शिक्षक), अर्जुन मच्छिंद्र प्रक्षाळे (सहा. शिक्षक), सुरेश सिद्धाराम उतगीकर (सहा. शिक्षक), नामदेव मच्छिंद्ग कुचेकर (सहा. शिक्षक),
जी. एस. गोटे (क.लिपीक), प्रविण प्रभुलिंग शिरपनहळळी (लिपीक), संतोषकुमार गंगाधर मंगुडे (सहा. शिक्षक), उदयकुमार मलसिद्ध उंबरजे (सहा. शिक्षक), उदयकुमार मलसिध्द उंबरजे (सहा. शिक्षक), मोहन अर्जुन आयवळे (सहा. शिक्षक), एम. अस्लम गुलामरसूल चंदा, विजयनाथ सिद्धरामप्पा हत्तुरे (मुख्याध्यापक),
शिवानंद भिमशा बिराजदार (मुख्याध्यापक), पांडुरंग रानबा धेडे, खंडू बबन साळवे, गुरूनाथ पांडुरंग सुतार, मनोजकुमार महादेव वाल्हेकर, विजय दत्तात्रय गोडसे, लक्ष्मण भीमरा भोसले, विकास रावसाहेब साळुंखे यांचा समावेश आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज