टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढच होताना दिसत आहे त्यात कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह येऊनही विलगीकरण कक्षात न राहता कोरोना प्रसार होण्यास कारणीभूत ठरल्या प्रकरणी भोसे (ता.मंगळवेढा) येथील 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी ग्रामसेवक अविनाश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की,21 ते 24 एप्रिल दरम्यान केलेल्या चाचणीमध्ये गावातील बाधित असलेल्यांपैकी 34 लोकांनी इतरांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून तयार करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात राहणे आवश्यक होते.
त्या 34 पॉझिटिव्ह लोकांनी विलगीकरण कक्षात दाखल न होता बाहेर फिरत असल्याने कोरोना रोगाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरू लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्तरीय समितीने त्यांना याबाबत सूचना देऊन देखील त्यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले.
यामुळे ब्रह्मदेव काकडे, अमोल कोंडूभैरी, लक्ष्मीबाई शिंदे, तानाजी कोळी, शिवाजी नागणे, तेजश्री नागणे, अनिल नागणे, उमा गायकवाड, विशाल काटकर, विजय कोरे, अजित कोळी, अनिल विष्णू नागणे, प्रदीप पाटील, संगीता काटकर, दत्ता जगधने, अशोक घाडगे, रत्नमाला सावंत, बाळासाहेब पाटील, अर्चना खडतरे, विजय गिरी, अनिकेत नायकवडी, दत्तात्रय खडतरे,
वंदना कोपे, तुकाराम नायकवडी, राजाराम खडतरे, विलास काकडे, विमल काकडे, शोभा काकडे, तानाजी गंगधरे, अक्षय काकडे, शिवाजी काकडे, सुषमा काकडे, सीताराम काकडे, विक्रम काकडे यांच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 269, 270 साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम 1857 चे कलम 2, 3, 4 कायदा कलम 51 ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, येथील तलाठी जयश्री कल्लाळे यांनी खासगी रुग्णालयास सील केले. सध्या पोटनिवडणुकीच्या मतदानानंतर कोरोना रोगाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढत असताना कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नव्हते.
पण भोसे ग्रामस्तरीय समितीने आता आक्रमक पावले उचलल्यामुळे इतर गावांतील ग्रामस्तरीय समितीनेही आक्रमक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज