टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या काळात कोरोना बाधित रुग्णांची हेळसांड व गैरसोय होवू नये म्हणून मंगळवेढा नगरपरिषदेच्यावतीने हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
कोरोना रुग्णांनी सदर हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
कोरोनाची ही दुसरी लाट अतिशय भयानक असून मंगळवेढा नगरपरिषदेच्यावतीने वीरशैव मंगल कार्यालय, रुक्मिणीमाता मुलींचे वसतीगृह व महिला प्रशिक्षण इमारत येथे कोविड सेंटर सुरु करण्यात आलेली आहेत.
जर कोणी कोरोना रुग्ण असेल व त्याला होम आयसोलेशन होण्यास सांगितले असेल अशा रुग्णांच्या दररोज घरी जाऊन उपचारासाठी डॉ.समाधान टकले (9890779917, 8805479090) , डॉ.गिरीश मासाळ (९७६४७९१९०२) , डॉ.सदानंद माने (९८९०६८७९३९) व डॉ.सागर सचिंद्र भेकी ( ८६००९८५००१, ८१७७८१४८४३ ) या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन निशिकांत प्रचंडराव यांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज