टीम मंगळवेढा टाईम्स ।
अडीच-तीन महिने कोरोनामुक्त राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आता शंभरीकडे वाटचाल करीत आहे. शहरात सध्या ४० तर ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आहेत.
विशेष बाब म्हणजे १० तालुक्यांतील २३ रुग्णांपैकी २२ रुग्ण गावांमध्येच आहेत. जिल्हा प्रशासनाने दरवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतवैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, मोहोळ, सांगोला व दक्षिण सोलापूर या नऊ तालुक्यातील शहरी भागात एकही रुग्ण नाही.
पण, त्या तालुक्यांमधील गावांमध्ये १९ रुग्ण आहेत. पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात तीन तर शहरात एक रुग्ण आहे.
दरम्यान, राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये सध्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यात मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे व रायगड या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत.
तर दुसरीकडे सोलापूर, पालघर, सांगली, कोल्हापूर, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अकोला या दहा जिल्ह्यांमध्ये मार्चमध्ये एकअंकी असलेली रुग्णसंख्या आता दोन अंकी झाली आहे.
बाजारपेठांमध्ये वाढलेली नागरिकांची गर्दी, मास्कचा वापर नाही आणि प्रतिबंधित लस टोचण्याकडे फिरवलेली पाठ, ही कारणे त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अजूनही बऱ्याच व्यक्तींनी लसीचा पहिला, दुसरा डोस घेतलेलाच नाही.
शहरातील कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक होत आहेत. पण, रुग्ण वाढू नये म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. लक्षणे असल्यास पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी स्वतःहून टेस्ट करून घ्यायला हवी.
प्रतिबंधित लस घेतल्यास धोका कमी होईल. रुग्ण वाढल्यास प्रतिबंधित उपाययोजना कराव्याच लागतील.- डॉ. बसवराज लोहारे, आरोग्याधिकारी, सोलापूर महापालिका
आरोग्य विभागाचा पंचसूत्रीवर भर
कोरोनाच्या पहिल्या दोन लाटनंतर तिसरी लाट सौम्यच होती. प्रत्येक लाटेला थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने पंचसूत्रीवरच अधिक भर दिला. त्यात ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, व्हॅक्सिनेशन (लसीकरण) व मास्क या पाच बाबींचा समावेश आहे.
आता कोरोना रुग्ण वाढत असतानाही अजून आरोग्य विभागाने टेस्टिंग वाढविलेले नाहीत. एखादा रुग्ण आढळल्यावर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचीच टेस्ट केली जात आहे. दररोज शहरातील सरासरी ७० तर ग्रामीणमधील ८० संशयितांचीच टेस्ट केली जात आहे.(स्रोत; लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज