मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सरकराने काही गंभीर पाऊले उचलली आहेत. सरकारने मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह, शाळा, कॉलेज, व्यायामशाळा आदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यापाठोपाठ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पॉईज (एफडब्ल्युआईसीई), इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इम्पा), वेस्टर्न इंडिया फिल्म्स प्रोड्युसर असोसिएशन (डब्ल्युआईएफपीए), आईएफपीटीसी आणि गिल्डचे पदाधिकारी यांनी आज (15 मार्च) तातडीची बैठकीत घेण्यात आली.
या बैठकीत ऑल इंडिया एम्लॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष आणि फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्लॉईजचे सरचिटणीस अशोक दुबे, फेडरेशनचे मुख्य सल्लागार आणि डायरेक्टर असोसिएशनचे अशोक पंडित, इम्पाचे अध्यक्ष टी.पी.अग्रवाल, कार्यकारी सदस्य अभय सिन्हा, सुषमा शिरोमनि, वेस्टर्न इंडिया फिल्म प्रोड्युसर असोसिएशनचे अध्यक्ष संग्राम शिर्के, आईएफपीटीसीचे जे.डी. मजीठिया, निर्माता टिनू वर्मा, प्रदिप सिंह, आणि गिल्डचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
आता पंधरा दिवस चित्रीकरण बंद असल्याने चित्रीकरणात सहभागी असलेले स्पॉटबॉय, लाईटमन, मेकअप आर्टिस्ट, असिस्टंट कॅमेरामन आदी दैनंदिन पगारावर काम करणाऱ्यांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज