टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत दामाजी कारखान्याच्या प्रगतीमध्ये कामगारांचे योगदान मोठे असून, त्यांच्या भविष्य निर्वाह निधी व नियमित वेतनाबाबत संचालक मंडळ सकारात्मक आहे. त्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी दिली.
दामाजी कारखान्याला एनएफडीसीकडून ९४ कोटींचे अर्थसाह्य उपलब्ध झाले. त्यामध्ये अध्यक्ष शिवानंद पाटील व संचालक मंडळाचे मोठे योगदान ठरल्यामुळे कामगारांच्या वतीने कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष पाटील यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्व संचालक व कामगार उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, कारखान्याचा कारभार आमच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून सभासदांनी सोपवला. त्यावेळी अवघे तीन लाख रुपये खात्यावर शिल्लक होते.
माजी आमदार प्रशांत परिचारक, उमेश परिचारक, भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली व ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे, राहुल शहा, रामकृष्ण नागणे, दामोदर देशमुख यांनी पाठीवर हात ठेवल्यामुळे कारखान्याचे दोन गळीत हंगाम यशस्वीरीत्या पार पडले.
ऊस उत्पादक व वाहतूक ठेकेदारांची बिले देखील वेळेत अदा करू शकलो. तालुक्यातील ऊस उत्पादकांचा विश्वास कारखान्यावर वाढल्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला. त्यासाठी अर्थसाह्याची गरज होती.
अर्थसाह्य उपलब्ध करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रस्ताव दिला होता, मात्र माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पाठवलेल्या एका टेक्स्ट मेसेजवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९४ कोटींचे अर्थसाह्य उपलब्ध केले.
त्यामुळे यापुढील काळात कारखान्याचे गळीत हंगाम चांगल्या पद्धतीने पार पाडून ऊस उत्पादकांची देयके वेळेत अदा करण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा राहील.
त्याचबरोबर कामगारांचा पगार व त्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत संचालक मंडळ सतर्क राहील.
यावेळी संचालक राजेंद्र पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल गायकवाड यांचीही भाषणे झाली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज