टीम मंगळवेढा टाईम्स।
इंग्लिश स्कूल, भोसे प्रशालेत आज भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मंगळवेढा दिवाणी व फौजदार न्यायालयाचे न्यायाधीश पी.पी.बागुल उपस्थित होते.
याप्रसंगी त्यांच्या शुभहस्ते कै.सौ.सुशीलाताई मोरे बहुउद्देशीय प्रतिष्ठान तर्फे भारतीय संविधानाची प्रत प्रशालेचे मुख्याध्यापक जयराम आलदर यांच्याकडे प्रशालेस सुपूर्त करण्यात आली.
त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय संविधानाने नागरिकांना बहाल केलेले मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, जबाबदाऱ्या याविषयी बहुमोल मार्गदर्शन करून आपल्या मूलभूत हक्क
व स्वातंत्र्याविषयी जागृती निर्माण करून देशाचा भावी सक्षम व जबाबदार नागरिक निर्माण होण्याविषयी प्रेरणा निर्माण केली.
तसेच तालुकास्तरीय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत निवड झाल्याबद्दल
कु.अस्मिता सुहास जाधव(प्रथम), कु.तनुजा अशोक दुधाळ(द्वितीय),वर्षल सोमनाथ वाघमोडे (तृतीय)यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रशालेचे मुख्याध्यापक जयराम आलदर सर यांनी सर्वांचे स्वागत करून संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या
व प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देऊन कै. सौ. सुशीलाताई मोरे बहुउद्देशीय प्रतिष्ठान द्वारे वेळोवेळी राबवल्या जाणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती दिली.
यावेळी विश्वनाथ मोरे साहेब व महादेव गायकवाड वकील यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी मंगळवेढा बार असोसिएशनचे सदस्य कोळेकर वकील, गायकवाड वकील,भोसे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अविनाश मोरे, निवृत्त मुख्याध्यापक मोरे सर, गोविंद मोरे ,पोलीस कॉन्स्टेबल माने साहेब घोंगडे साहेब उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कै. सौ .सुशीलाताई मोरे प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती निकम सर यांनी केले, तर महादेव दसवत यांनी आभार मानले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज