mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

ग्रामपंचायत उमेदवारांना दिलासा! उमेदवारी अर्ज ऑफलाईन पद्धतीने भरता येणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 29, 2020
in राजकारण
सरपंच पदासाठी होतीये रस्सीखेच! ‘या’ प्रवर्गातील जागा अधिकाधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न

टीम मंगळवेढा टाईम्स ।

तांत्रिक अडचणींचा विचार करता ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 29 डिसेंबर) परवानगी दिली.

दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची 30 डिसेंबर रोजीची वेळही आता संध्याकाळी साडेपाचपर्यंत करण्यात आली आहे. पूर्वीची ही वेळ दुपारी तीनपर्यंत होती. निवडणूक आयोगाने या बाबतचे निर्देश आज दुपारी जारी केले आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्णयात म्हटले आहे की, उमेदवारी अर्ज दाखल करताना 28 डिसेंबरपासून तांत्रिक अडचणी येत आहेत. यात सर्व्हर तसेच इंटरनेटची गती कमी असणे, या मुळे अनेक उमेदवारांपुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

इच्छुक उमेदवार नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापासून वंचित राहू नये व त्यांना निवडणूक लढविण्याची संधी मिळावी; म्हणून आयोगाने उमेदवारी अर्ज पारंपरिक पद्धतीने (ऑफलाईन) स्वीकारण्याचा तसेच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ 30 डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेपाचपर्यंत करण्याचाही निर्णय घेतला आहे.

पारंपरिक पद्धतीने स्वीकारलेले उमेदवारी अर्ज संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वैध उमेदवारी अर्ज संगणक चालकांच्या मदतीने संगणक प्रणालीत आरओ लॉगईन’ मधून भरून घेण्याचेही निर्देश आयोगाने दिले आहेत. या निर्णयामुळे अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

ऑनलाईन पद्धतीने संगणकावर अर्ज दाखल करताना ग्रामीण भागातील विशेषतः महिला उमेदवारांची मोठी दमछाक होत आहे, या मुळे यंत्रणेवरील ताण कमी होण्याऐवजी ताण वाढल्याचेच चित्र होते.

तांत्रिक बाबी परिपूर्ण नसल्याने इंटरनेटला स्पीड नसणे व सर्व्हर डाऊन असल्याने अनेकांना पळापळ करावी लागत आहे. या निर्णयामुळे आता पारंपरिक पद्धतीने उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: ग्रामपंचायतनिवडणूक

संबंधित बातम्या

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

August 8, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

खळबळ! एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर, 40 वर्षाच्या राजकीय जीवनात असा माणूस पाहिला नाही; शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

August 5, 2025

माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला! ‘कृषी’ गेले, आता झाले ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री

August 1, 2025
नागरिकांनो! आमदारांना सरकारमध्ये किमंत नाही, पंढरपूर-मंगळवेढ्यासाठी एक ही रुपयाची योजना खेचून आणू शकले नाहीत; अभिजीत पाटील‌ यांनी केले आ.आवताडेंवरती गंभीर आरोप

दिलदार नेतृत्व! आ.अभिजीत पाटील वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम; रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देणार

August 1, 2025
काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दौऱ्यात राडा; बैठक न घेताच गावातून हताशपणे लागले परतावे

खळबळ! खा.प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला मंगळवेढ्यात जोडे मारून केले प्रतिमा दहन; काँग्रेसकडून त्याच ठिकाणी शिंदे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक; नेमके काय आहे प्रकरण?

July 30, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

रतनचंद शहा सहकारी बँकेच्या निवडणुकीमध्ये ३० टक्के मतदान; ‘इतक्या’ हजार सभासदांनी बजावला मतदानाचा हक्क; आज मतमोजणी

July 28, 2025
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात; ‘या’ महत्त्वाच्या घोषणा करणार?

July 23, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

निकराची झुंज! लोकनियुक्त सरपंचांना हटवण्यासाठी संपूर्ण गावाने मतदान केलं, अन् अविश्वास ठराव आणला; ‘या’ गावात नेमकं काय घडलं?

July 20, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

एकनाथ शिंदेंनी घेतली मंत्री-आमदारांची शाळा, शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदे यांनी दिला आमदारांना ‘हा’ कडक इशारा

July 16, 2025
Next Post
सोलापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण जाहीर, ‘या’ तारखेला होणार गावनिहाय आरक्षण

सिद्धेश्वर यात्रेबाबत आज होणार निर्णय, नियम व अटी घालून यात्रेस परवानगी ?

ताज्या बातम्या

कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् महाराष्ट्रातील ‘या’ गावावर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

August 9, 2025
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामस्थांना कोणतीही माहिती न देता बोगस ग्रामसभा दाखवून गावात बियर बारला दिले नाहरकत प्रमाणपत्र; सरपंच व सदस्यपद केले रद्द

August 9, 2025
धक्कादायक! मंगळवेढ्यातील ‘या’ गावात ४० शेळ्या- मेंढ्या दगावल्या; मृत्यूचे कारण आले पुढे…काळजी घेण्याचे आवाहन

दुःखाचा डोंगर कोसळला! मंगळवेढ्यात विषारी वनस्पती पाला खाऊन १०० मेंढ्या, शेळ्या मृत्युमुखी; २५ लाखांचे अचानकपणे नुकसान; कधीही भरून न येणारी झाली आर्थिक हानी

August 9, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! ट्रॅक्टरमध्ये करंट उतरल्याने सोलापुरात दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू; दोघांना वाचवायला गेलेला एक जण जखमी

August 8, 2025

मेडिकल औषधे घेवून जाणाऱ्या विवाहित महिलेचा विनयभंग; युवकावर मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

August 8, 2025
रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

रेनबो किड्स इंग्लिश मिडीयम स्कूलमुळे सलगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणार, उद्याच्या उज्वल पिढीला साक्षरतेचे पैलू पडतील; आ.समाधान आवताडे यांचे गौरोउद्गार

August 8, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा