टीम मंगळवेढा टाईम्स।
“चंद्रभागा अडवली, ती दुष्काळी जिल्ह्याच्या शेतशेतात पाणी जाईल. कानासाच्या दाण्यात पांडूरंग दिसेल, असं उजनी धरण करताना यशवंतराव चव्हाण सांगायचे. आज 40 साखर कारखाने या जिल्ह्यात आहेत.
उजनीमुळे हे शक्य झाले. इथली द्राक्षे, डाळींब, केळी जगात जातात. ही क्रांती उजनी व शेतकऱ्यांमुळे झाली. आज पिढी बदलली. दोन्ही उमेदवारांची आधीची पिढी आमच्यासोबत काम करत होते. दोन्ही उमेदवाराचे विचार चांगले आहेत.
धैर्यशील मोहिते विजयी झाले तर संसदेत सोलापूर जिल्हा चमकेल”, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली.
यावेळी ते बोलत होते. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराजे देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, मोदी लोकांसाठी सत्ता वापरात नाहीत. आता भाषणात नेहरू-गांधी यांच्यावर टीका करतात. नेहरूंनी स्वातंत्र्याच्या आधी अनेक वर्षे तुरुंगात घालवली. देशाची प्रगती करून जगात नेहरूंनी केले. प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना सोबत घेवून जायचे तर ते जाती जातीत भांडणे लावत आहेत.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, विशिष्ट विचार सरणीच्या लोकांच्या विचारणे देश चालवतात. पुन्हा सोरेन आणि केजरीवाल यांचे उदाहरण दिले. यांनी चांगले काम केले पण मोदी धोरणावर टीका टिप्पणी केली म्हणून जेल मध्ये टाकले.
अनिल देशमुखांना 6 महिने तुरुंगात टाकले , संजय राऊतही यांनाही तीन महिने तुरुंगात टाकले. यासाठी सत्ता घेता ? रशियातील पुतीन आणि तुमच्यात काय फरक ? असा सवाल शरद पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
जागृत राहून परिवर्तन करावे लागेल. लोकशाहीवर संकटाचे ढग दिसत आहेत. प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहितेंना मतांचा विक्रम करून संसदेत पाठवा. मी संसदेत आहे त्यांच्या पाठीशी राहून काम केले जाईल, असंही शरद पवार यांनी सांगितलं.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज