टीम मंगळवेढा टाईम्स ।
उजनी धरणातील सोलापूर जिल्ह्याचे हक्काचे पाणी कोण पळवून नेत असेल तर त्याच्याविरोधात काँग्रेस कठोर भूमिका घेणार असल्याचा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे.
ते मंगळवेढा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
मोहिते-पाटील पुढे बोलताना म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अस्मितेचा जिव्हाळ्याचा प्रश्न उजनीचे पाणी आहे.
त्यामुळे आघाडी बिघाडी होईल याचा विचार आम्ही करणार नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना नाव न घेता दिला आहे.
ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्त्यांना ताकद देऊन कॉग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहचवणार असल्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवेढा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
11 ऑक्टोंबर रोजी महाराष्ट्र बंद ची काँग्रेस पक्षाने (आघाडी सरकारने) हाक दिली आहे.
याप्रसंगी तालुकाध्यक्ष अँड.नंदकुमार पवार,जिल्हा सरचिटणीस दिलीप जाधव, युवक अध्यक्ष संदीप फडतरे, भीमराव मोरे, राजाभाऊ चेळेकर,नेताजी सावंजी,मनोज माळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज