टीम मंगळवेढा टाईम्स ।
आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात मनोमिलन घडवण्यात भाजप पक्षश्रेष्ठींना यश आले असले तरी कार्यकर्त्यांची भावना मात्र वेगळी असल्याचे पहावयास मिळत आहे.
दोन नेत्यांमध्ये मनोमिलन झालं असलं तरी कार्यकर्त्यांपर्यंत ते पोहोचणार का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत त्यांची भावना जाणून घेतली. प्रशांत मालकांनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवावी अशी भावना समर्थकांची होती.
दरम्यान, स्वतः परिचारक यांनी आमदार समाधान आवताडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कार्यकर्ते परिचारक यांनी निवडणूक लढवावी यावर समर्थक ठाम होते.
निवडणुकीच्या तोंडावर परिचारक यांनी बैठका घेत निवडणूक लढवण्याचा माहोलही तयार केलेला होता. परिचारक यांना भाजपने तिकीट न दिल्यास ते अपक्ष निवडणूक लढवतील अशी शक्यता होती. मात्र तेवढ धाडस माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी दाखवलेल नाही.
आमदार समाधान आवताडे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तातडीने पंढरपूर मध्ये दाखल झाले, प्रशांत परिचारक व उमेश परिचारक यांच्यासमवेत बैठक घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला. दोघांचे मनोमिलन घडवण्यात यश देखील आले.
मात्र त्यावेळी प्रशांत परिचारक यांचा चेहरा सर्वकाही सांगून जात होता. तर दुसरीकडे परिचारक यांचे कार्यकर्ते आम्ही आवताडे यांचे काम करणार नाही, आम्ही दुसऱ्याला मदत करू पण त्यांना मदत करणार नाही अशी तीव्र संताप व्यक्त करू लागले आहेत.
दरम्यान, परिचारक यांनी घेतलेल्या बैठकीवेळी प्रशांत परिचारक म्हणाले होते की, मी कार्यकर्त्यांना कुणाच्या दावणीला बांधणार नाही. त्यावेळी त्यांनी आवताडे यांच्यावर रोष व्यक्त केला होता.
आता प्रशांत परिचारक यांनी पक्षाचा आदेश मानून पक्ष देईल ती जबाबदारी पार पडली जाईल असे जाहीर केले असले तरी परिचारक समर्थक मात्र आवताडे यांच्यावर नाराज आहेत.
आम्हाला जाणूनबुजून डावलले जातंय, त्रास दिला जातोय असे आरोप देखील आवताडे यांच्यावर केले होते. हे सर्व घडामोडी घडत असताना परिचारक सर्व समर्थकांची समजूत काढत असले तरी कार्यकर्ते मात्र प्रशांत मालकांचे काही ऐकून घेत नसल्याची चर्चा सुरू आहे.
परिचारक कार्यकर्त्यांची येवढी तिव्र नाराजी आवताडे यांच्यावर का आहे? आवताडेंना मनापासून मदत का करणार नाहीत? आवताडे यांनी परिचारक यांच्या समर्थकांना कसला त्रास दिला आहे? असे अनेक प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत.
दरम्यान, परिचारक गटातील काही समर्थक उघडपणे भालके व सावंत यांना मदत करणार असल्याचे बोलत आहेत. परिचारक यांच्या गटातील अनेक नेते सध्या वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याचे दिसत आहेत.
या समर्थकांना प्रशांत परिचारक कशा पद्धतीने आपलेसे करणार? हे येणाऱ्या काही दिवसातच समजेल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज