mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

येत्या १० तारखेला जनतेची कामे मार्गी लावूनच शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्या; पंढरीतील सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 5, 2023
in सोलापूर
येत्या १० तारखेला जनतेची कामे मार्गी लावूनच शासन आपल्या दारी कार्यक्रम घ्या; पंढरीतील सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये चेअरमन अभिजीत पाटील यांची मागणी

पंढरपूर : राजेंद्र फुगारे

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि विविध घटक यांच्या विविध प्रश्नाची सोडवणूक शासनाने करावी यासाठी यासाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सर्वपक्षीय आणि विविध संघटनेचे वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा तसेच सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा. उजनी धरणातून भीमा नदी उजव्या व डाव्या कालव्यात पाणी सोडावे. वीर धरणातून पाणी सोडून सोनके तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यात यावा तसेच टेल टू हेड पाणी मिळावे.

चारा डेपो सुरू करून जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा.दुधाला विना कपात ३८ रुपये दर द्यावा. शिक्षण व नोकरीमध्ये मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावे. जालना येथील मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या आंदोलकावर झालेल्या लाठी चार्जची उच्चस्तरीय चौकशी व्हावी व त्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय, येथे मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले.

यावेळी चेअरमन अभिजीत पाटील यांनी आपल्या भाषणात वरील मागण्या मांडत सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी सर्वांनी मिळून भाग पाडू असे सांगितले. येत्या १० तारखेला शासन आपल्या दारी येत आहे. त्यामधे जनतेची कामे मार्गी लावूनच आपल्या दारी यावे अशीही मागणी केली.

यावेळी स्वेरी कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष बी.पी.रोंगेसर, काँग्रेस पक्षाचे मा.जिल्हाध्यक्ष देवानंद गुंड पाटील, ज्येष्ठ विष्णूभाऊ बागल, पांडूरंग कारखान्याचे मा.व्हा चेअरमन आप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कौलगे, बिभिषन पवार, शशिकांत पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, काँग्रेस पक्षाचे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे,

शिवसेना ठाकरे गटाचे रणजीत बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील,  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संदीप मांडवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन आटकळे,

राष्ट्रवादी मंगळवेढा तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी, मुझमिल काझी, राष्ट्रवादी किसान सेलचे अध्यक्ष शुभांगी जाधव, राजश्री ताड, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सर्व संचालक यांसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आता चेअरमन काळे यांच्या घरावरही काढावा लागेल मोर्चा

विविध प्रश्नासाठी श्री विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसिलवर मोर्चा काढण्यात आला आहे.यावेळी अनेकांची भाषणे झाली. यामध्ये सहकार शिरोमणीचे माजी संचालक ॲड.दिपक पवार यांनी आपल्या भाषणात एवढ्या दिवसात बिले न दिलेल्या चेअरमन कल्याणराव काळे यांच्या घरावरही आता आपणाला लवकरच यापुढील काळात मोर्चा काढावा लागेल. असे सांगत, त्या सहकार शिरोमणी चे थकीत बिलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणला आहे.- ॲड. दिपक पवार

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजित पाटील

संबंधित बातम्या

सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

मागणी करा, चारा डेपो लगेच सुरू होणार; सोलापूरच्या शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांचा मोठा दिलासा; रब्बी पेरणीपूर्वी ‘हे’ तपासण्याचे आवाहन

October 8, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
Next Post
दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून ‘हे’ सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

दमदार योद्धा! अध्यादेश आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही, आजपासून 'हे' सुटलं म्हणून समजा; मनोज जरांगे यांचा सरकारला थेट इशारा

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांवर पाणी विकत घेण्याची वेळ येणार नाही! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आ.समाधान आवताडे सरसावले; प्रशासनाला तात्काळ टँकरचे आदेश

October 14, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026

आमदारांचे आदेश धाब्यावर, माफीनामा नाहीच! संतप्त सर्वसमाजाचा मंगळवेढ्यात लोकशाही मार्गाने एल्गार; आजपासून सह्यांची मोहीम

October 13, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; सोलापूर शिक्षण विभागाचे शाळांना आदेश; शासनाच्या निर्णयानुसार ‘या’ परीक्षांसाठी शुल्कमाफी लागू

October 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा