टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाच्या निर्बंधांमुळे मागील नऊ महिन्यांपासून आठवडा बाजार बंद होते . याचा फटका ग्रामीण भागाच्या अर्थचक्राला बसला होता.
कोरोनाचा कहर कमी झाल्याने आता पुन्हा आठवडा बाजार सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी परवानगी दिली असून शुक्रवारपासून बाजार सुरू होतील.
बाजारात येणाऱ्या नागरिकांना मास्क आणि सॅनिटायझर बंधनकारक करण्यात आला आहे. तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी काढला आहे .
यामध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली असल्याने. आपत्ती व्यवस्थापन 2005 अन्वये प्राप्त अधिकारानुसार शहर पोलीस आयुक्तालयची हद्द वगळून
सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्रकारचे आठवडा बाजार व जनावरांचे बाजार दिनांक 28 ऑक्टोबर 2021 पासून भरण्यास परवानगी देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी निर्गमित केले आहे.
सदर आठवडा बाजारामध्ये कोविड-19 च्या अनुषंगाने शासनाने तसेच जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करण्यात येते का याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियत्रंण ठेवावे.
तसेच आठवडा बाजारात स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने दिलेल्या अटींचे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
आठवडी बाजाराशी संबधित असणाऱ्या आस्थापनांनी बाजार भरण्याच्या ठिकाणी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन याबाबत नियमांचे पालन करावे. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच शासनाने व जिल्हा प्रशासनाने कोविड-19 च्या अनुषंगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस प्रशानाने नियंत्रण ठेवावे.
सदरचे आठवडा बाजार स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरु राहण्यास परवानगी असेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. (स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज